*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तामलवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) : तामलवाडी ग्रामपंचायतीकडून सन २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांपासून दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ५% स्वनिधी वाटप करण्यात आला नसल्याचा आरोप आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी केला आहे.
*काय आहे प्रकरण?*
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या उत्पन्नाच्या ५% निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र तामलवाडी ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांपासून हा निधी वाटप केलेला नाही, असा दावा सावंत यांनी आपल्या दि. १०/०८/२०२६ रोजीच्या निवेदनात केला होता. त्यांनी १४ ऑगस्ट २०२६ पूर्वी निधी वाटप करावा, अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दि. १५/०८/२०२६ रोजी त्यांनी उपोषण केले त्याद्वारन ग्रामपंचायतीने दि. १५/०९/२०२६ च्या पत्रान्वये मागील अनुशेषासह निधीचा विनियोग करू व सर्व माहिती माहिती पुढील ०७ दिवसांत देऊ, असे लेखी आश्वासन प्रशासक सरपंच सौ नूरबानू सिकंदर बेगडे व ग्रामसेवक श्री चैतन्य गोरे यांनी दिले होते.
*आश्वासन पाळले नाही - पुन्हा उपोषणाचा इशारा*
आश्वासन देऊनही ०७ दिवसांत दिव्यांग बांधवांची माहिती, निधी वाटपाबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही, असा आरोप करत सावंत यांनी दि. ०८/०९/२०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांच्याकडे तक्रार केली व दि. १९/०९/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, तामलवाडी समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. याची दखल घेत पोलीस ठाणे तामलवाडी यांनी दि. १८/०९/२०२६ रोजी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये नोटीस बजावली आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यात मा. अपर जिल्हाधिकारी यांचे कलम ३७(१)(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, दि. १९/०९/२०२६ रोजी श्री सावंत यांनी उपोषण केले त्याद्वारन ग्रामपंचायतीने दि. १९/०९/२०२६ च्या पत्रान्वये मागील अनुशेषासह निधीचा विनियोग करू व सर्व माहिती माहिती पुढील ३० दिवसांत म्हणजे १९/१०/२०२६ पर्यंत देऊ, असे लेखी आश्वासन प्रशासक विस्तारअधिकारी (पंचायत)श्री ताटे व ग्रामसेवक श्री चैतन्य गोरे यांनी दिले होते.
आश्वासित दिनांक १९/१०/२०२६ उलटून जाण्या अगोदर कार्यवाही न झाल्याने सावंत यांनी दि. ०९/१०/२०२६ रोजी पुन्हा स्मरणपत्र / अंतिम इशारा पत्र दिले आहे. यात २०२३-२४ पासूनचा संपूर्ण ५% निधीचा हिशोब, लाभार्थ्यांची यादी व खर्च जाहीर करावा, *अन्यथा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या तरतुदीनुसार मा. जिल्हाधिकारी धाराशिव व दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल,* असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*तामलवाडी ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधी वाटपावरून वाद; माजी सैनिकाची तिसऱ्यांदा उपोषण आंदोलन करण्याची तयारी*
*तामलवाडी ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधी वाटपावरून वाद; माजी सैनिकाची तिसऱ्यांदा उपोषण आंदोलन करण्याची तयारी*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा