Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता देशापुढील सर्वात मोठी समस्या- प्रा‌. धनंजय देशमुख

*उपसंपादक-- नूरजहाँ शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
तरुण पिढीला करिअरचा मानसिक ताणतणाव सक्षमपणे हाताळता येत नाही त्यामुळे ते कुठे तरी मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु हा मानसिक आधार कशातच मिळाला नाही तर ते व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे करिअर तसेच नातेसंबंधातील ताणतणावामुळे निर्माण होणारी व्यसनाधीनता ही दिशा पुढील सर्वात मोठी समस्या आहे असे प्रतिपादन व्यसन जाणीव जागृती सोलापूर जिल्हा समन्वयक व व्यसनमुक्त युवक संघाचे प्रा‌. धनंजय देशमुख यांनी केले. दि मॉडेल विविधांगी प्रशाला ज्युनिअर कॉलेज माळीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने व्यसन जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती कार्यशाळेमध्ये श्री.देशमुख बोलत होते.
प्रा.देशमुख म्हणाले, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, अभ्यास व इतर गोष्टीतील ताण, व्यसन करणाऱ्या मित्रांची संगत, त्याचबरोबर घरातील जेष्ठांची दारू किंवा तंबाखू दिसल्याने त्याची उत्सुकता वाढते त्यामुळे व्यसनांच्या आहारी जातात. तंबाखू,गुटखा या व्यसनांपेक्षा अमली पदार्थांचे सेवन महाविद्यालयीन त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला आहे. एका सर्व्हेनुसार सध्या देशातील शाळकरी १२ ते १९ वयोगटातील मुल मुली अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. सद्या युवकांच्या जीवनावर डिजिटल व्यसनांचाही गंभीर परिणाम दिसून येत आहेत. ५० टक्के पेक्षा अधिक युवक दररोज ४ ते ६ तास सोशल मीडियावर घालवत आहे हे आताच्या काळातील सर्वात घातक व्यसन असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक सुनील जवरे, व्यसनमुक्त युवक संघाचे जिल्हा मार्गदर्शक पोपट जमदाडे,सहशिक्षिका सविता क्षीरसागर, रजनी चौरे, वैशाली बनकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या करिअर बरोबरच पुढील आयुष्यामध्ये मी स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांना व्यसनमुक्त करील अशी शपथ प्रा. देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा