*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- : पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असतानाही नीरा व भीमा नद्यां पुरेसे पाणीअभावी कोरड्या पडल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यांतील अनेक भागांत पावसाअभावी शेतीची परिस्थिती गंभीर झाली असून, हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांकडून उजनी व वीर धरणातून नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणीने जोर धरला आहे. सीना माढा बोगदा व कॅनॉल पाण्याने फुल्ल भरून वाहत असताना नद्या कोरड्या कशा?
यावर्षी पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊसच झाला नसल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी ऊस, चारा, फळे, भाजीपाला तसेच इतर पिके जोपासली आहेत. मात्र, सध्या पिकांना निर्णायक टप्प्यावर पाण्याची गरज असताना नदीपात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. नीरा व भीमा नदीकाठच्या विहिरी, विंधनविहिरी तसेच लघुसिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीतही घट होत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्यावर व पिण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उजनी व वीर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून नीरा व भीमा नदीपात्रात आवश्यक प्रमाणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नरहरी काळे, श्रीकांत दंडवते, दादासाहेब क्षिरसागर, केशव बोडके, अशोक बोडके, शशिकांत सूर्यवंशी, राहुल बागल, मुबारक तांबोळी, शब्बीर शेख आदि शेतकऱ्यांनी केली आहे. नदीपात्रात पाणी आल्यास नदीकाठच्या गावांतील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होऊन शेतीला मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी संतोष सूतार, विक्रम मोहिते, रणधीर मोहिते, नंदकुमार शिंदे, आदित्य गायकवाड आदिंनी केली आहे.
पिके काढणीच्या टप्प्याजवळ आली असताना पाण्या अभावी शेतकऱ्यांचे महिन्यांचे कष्ट आणि खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. उजनीत सध्या ११२ टीएमसी पाणी असून ९७ टक्के भरले आहे. सध्याला सेना म्हाडा बोगदा ९०० व कालव्यामधून ३००० क्युसेक्सचा विसर्ग सुरूच आहे. मात्र भीमा नदी कोरडी पडली असताना पाणी सोडले जात नाही. उजनी धरण प्रशासनाकडून हा दुजाभाव केला जात असल्याने शेतकरी व नागरिकांनी चीड व्यक्त केली आहे.
चौकट - महाराष्ट्र शासनाने इंदापूर तालुक्यात नुकताच दुष्काळ जाहीर केला असून त्या संदर्भातील उपाययोजनेसाठी हालचाली सुरू करण्याचे आदेश मात्र अधिकाऱ्यांना दिले नसल्याचे दिसते. मजुराच्या दोन हाताला काम, जनावरांना चारा व पाणी, नागरिकांना पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मजुरांना कामे नसल्याने धान्य उपलब्ध करून द्यावे अशी ही मागणी होत आहे.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडल्याचे दिसत आहे.
------------------------------------------
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
नीरा-भीमा नद्या ऐन पावसाळ्यात कोरड्या; हाता तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर इंदापूर, माढा, माळशिरस तालुक्यांतील पिकांना पाण्याची गरज; उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्याची शेतकरी, नागरिकांची मागणी
नीरा-भीमा नद्या ऐन पावसाळ्यात कोरड्या; हाता तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर इंदापूर, माढा, माळशिरस तालुक्यांतील पिकांना पाण्याची गरज; उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्याची शेतकरी, नागरिकांची मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा