*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी*
*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
शनिवार, १० ऑक्टोबर २६
बिहार राज्यातील सर्वांगीण ऊस विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करण्यास राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ तयार आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्याशी बिहार राज्यातील साखर उद्योगाच्या विकासा संदर्भात गुरुवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी बैठक झाली. या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बिहार राज्यातील ऊस विकासासाठी कृत्रिम बुद्धिमतत्ते सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ऊस विकासामध्ये सल्लागार भूमिका बजावण्यासाठी
नोडल एजन्सी म्हणून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ सहकार्य करण्यास तयार असल्याचे पत्र मुख्य सचिवांकडे सुपूर्त केले. त्यावरती मुख्य सचिवांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बिहार सरकारला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाला मिळालेल्या ११ वर्क ऑर्डर पैकी ३ चे प्रकल्प अहवाल सादर केले, उर्वरित प्रकल्प अहवाल पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे तत्पर कामकाजाबद्दल कौतुक केले. यावेळी मुख्य सचिवांनी बिहारमध्ये पाटणा येथे दि. २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या साखर उद्योग पुनरुज्जीवनासह विविध प्रकल्पांच्या कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे निमंत्रणही अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना दिले. यावेळी महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.
शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
बिहार राज्यातील ऊस विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून सहकार्य करण्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ तयार : अध्यक्ष हर्षवर्धन पाटील.
बिहार राज्यातील ऊस विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून सहकार्य करण्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ तयार : अध्यक्ष हर्षवर्धन पाटील.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा