*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उजनी जलाशय व परिसरात होऊ पाहणाऱ्या १) तरंगता सौरऊर्जा प्रकल्प २) एआय डेटा सेंटर आणि कॅम्पस ३) ग्रीन हायड्रोजन प्रकल्प व ४) स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर या चारही प्रकल्पांना आमदार नारायण आबा पाटील यांनी विरोध दर्शविला असल्याची माहिती पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की मुळात मागील आठवड्यात उजनी वरील या प्रकल्पाची चर्चा ज्या बैठकीत करण्यात आली त्या बैठकीसाठी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना जाणीवपूर्वक निमंत्रण दिले गेले नाही. या बैठकीबाबत संबंधित विभागाकडून कोणताही ईमेल अथवा फोन कॉल आलेला नाही. परंतु ज्यावेळी या प्रकल्पांबाबत माहिती मिळाली त्या क्षणी आमदार नारायण आबा पाटील यांनी तात्काळ यावर हरकत घेऊन आपला विरोध नोंदवला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाटबंधारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना एक निवेदन पाठवण्यात आले आहे. या निवेदनात आमदार नारायण आबा पाटील यांनी म्हटले आहे की उजनी धरणावर जलसंपदा विभागामार्फत SEED - तरंगती सौर ऊर्जा (2000 MW), बॅटरी स्टोरेज (1800 MWb) व AI डेटा सेंटर (1400 MW) हा PPP तत्वावरील प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जलाशयाच्या 33,630 हेक्टर पैकी सुमारे 3,000 हेक्टर म्हणजेच 9% जलक्षेत्र व्यापले जाणार आहे. सदर प्रकल्पाची केवळ प्राथमिक चर्चा सुरू असून निर्णय घेतलेला नाही असे कंपनी म्हणत असली तरी करमाळा व माढा तालुक्यातील हजारो मच्छिमार व शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड भीती व रोषाचे वातावरण आहे. उजनीवर 1500 पेक्षा जास्त कुटुंबे मासेमारीवर अवलंबून आहेत. 3000 हेक्टरवर पॅनल टाकल्यामुळे मासेमारीचे क्षेत्र, मासे उत्पत्तीचे ठिकाण व बोटीचे मार्ग बंद होतील. माशांच्या प्रजनन क्षेत्रात (उथळ पाण्यात) अडथळा निर्माण होऊन मत्स्योत्पादन घटेल. कंपनी 1.2 पट माशांची वाढ होते असा दावा करत असली तरी तो इतर तलावांवरील अभ्यास आहे. प्रत्यक्षात सावलीमुळे पाण्याचे तापमान, BOD बदलून नैसर्गिक जैवविविधता नष्ट होईल. उजनी जलाशयावर व जलाशयाकाठी वर्षातून काही महिने परदेशातून फ्लेमिंगो व पक्षी वारस्थ्यासाठी येतात. सदर प्रकल्पामुळे या पक्षांचे जीवनमान धोक्यात येऊन शक्य असल्याने पक्षी प्रेमी व पर्यावरण वाद्यांच्या या प्रकल्पास विरोध दर्शविला आहे.
प्रकल्पासाठी वर्षाला 0.50 TMC (38.80 MLD / 14.16 MCM) पाणी लागणार आहे. त्यातील 64% पाणी डेटा सेंटर शीतकरणासाठी वापरणार आहे. उजनीचे उपयुक्त पाणी आधीच 53.6 TMC असताना व दरवर्षी 15.9 TMC बाष्पीभवन होत असताना नवीन 0.50 TMC पाणी देणे म्हणजे पिण्याच्या पाण्यावर व सिंचनावर अन्याय आहे. तसेच खाजगी शेतजमीन संपादन नाही असे सांगितले जात असले तरी ग्रीन हायड्रोजन (6900 टन) व ट्रान्सशिपसाठी जमिनीची मागणी होणार आहे. तरी आपणास विनंती आहे की, कंपनीने दिलेल्या 9 बाधितप्या (पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, मच्छिमारांशी सल्लामसलत केल्याशिवाय रचना अंतिम नाही इ.) या फक्त कागदावर असून प्रत्यक्षात स्थानिकांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील शेतकरी व मच्छिमार बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन सदर SEED प्रकल्पाला स्थगिती देऊन तो तात्काळ रद्द करावा असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी म्हटले आहे. तर या प्रकल्पांना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दर्शविलेल्या विरोधावरुन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी टिका केली असून उजनी प्रकल्पाबाबत कथित फोन रेकॉर्डिंग नंतर विरोध दाखवून संजयमामांकडून 'सारवासारव' म्हणजे 'अवचित पडे आणि दंडवत घडे' असाच काही प्रकार आहे. संजयमामा हे या बैठकीत अधिकाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हजर होते. उजनीवरील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या या प्रकल्पांची चर्चा सुरू असताना संजयमामा हे आक्रोड, बदाम व काजु वर ताव मारत प्रकल्पांना मुक संमती देत होते. परंतु ही माहिती बाहेर पडताच व शेतकऱ्यांच्या विरोधाचा सुर पाहताच संजयमामा यांनी आपली भुमिका बदलली व आता केवळ दिखावा म्हणून विरोध दर्शविला असल्याची टिका पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केली.
शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*उजनी वर होऊ पाहणाऱ्या चारही प्रकल्पांना आमदार नारायण आबा पाटील यांचा विरोध, पाटील गटाकडून सविस्तर माहिती
*उजनी वर होऊ पाहणाऱ्या चारही प्रकल्पांना आमदार नारायण आबा पाटील यांचा विरोध, पाटील गटाकडून सविस्तर माहिती
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा