*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करमाळा ते जामखेड या ४० किलोमीटर लांबीचा हा राज्यमार्ग १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता होणार आहे. लवकरच अंदाजपत्रक पुर्ण करून, पुढील दोन महिण्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून,या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
आशियाई डेव्हलपमेंट बँक प्रकल्पाच्या वरीष्ठ अधिका-यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांकडून सविवारी (ता.१८) करमाळा ते जामखेड या रस्त्याची पाहणी केली. आशियाई डेव्हलपमेंट बँक प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, आशियाई डेव्हलपमेंट बँक प्रकल्पाचे मुंबई रिजनचे समन्वयक कार्यकारी अभियंता अतूल गुरूव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता शशिकांत सुतार , शाखा अभियंता चांगदेव बांगर यांच्यासह या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार कंपनी रिअलट्रेंग्थ इन्र्फाट्रक्चर चे प्रतिनिधींनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली.
यावेळी या अधिका-यांनी जवळा गावाजवळील सीना नदीवरील सर्वात जुन्या पुलाची नदीपात्रात जाऊन पाहणी केली. साधारण ५५ वर्षांचा हा पुल पाडून नवीन पुल बांधण्यात येणार आहे. हा पुल १२ मीटर रूंदीचा प्रशस्त पुल होणार असुन, पुलाची उंची दोन मीटरने वाढवली जाणार आहे. तर पोथरे येथील पुलाची रूंदी वाढवली जाणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिला असून, सूरूवातीपासून त्यांनी आग्रही भूमिका घेत या कामासाठी पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा महामार्ग करण्यात येणार आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर होणार असला, तरी रस्त्याचा मूळ दर्जा राज्यमार्ग ५६ हाच राहणार आहे.
शनीदेवाच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाणारे पोथरे येथील शनी देवस्थान , जवळा येथील ब वर्ग दर्जा प्राप्त श्री जवळेश्वर देवस्थान या मार्गावर असून, नान्नज, बोर्ले, झिक्री यांसारखी मोठी गावे या मार्गालगत असल्याने या गावांचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर करण्यात येणारा हा राज्यमार्ग भविष्यात करमाळा, जामखेड अहिल्यानगर, सोलापूर ,बीड या मोठ्या शहरांना अधिक सक्षमपणे जोडणारा विकासमार्ग ठरणार आहे.
*महामार्गाची वैशिष्ट्ये-*
——————————
- आशियाई डेव्हलपमेंट बँकेचे ३०० कोटींचे अर्थसाह्य
- १० मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता
- सीना नदीवर १२ मीटर रूंदीचा नवीन पुल होणार.
- पोथरे येथील पुलाची रूंदी वाढवली जाणार.
- करमाळा शहर , पोथरे, जवळा, बोर्ले, नान्नज, झिक्री, पाडळी फाटा, जामखेड शहर या गावांनजीक रस्ता २० मीटर रुंदीचा व चौपदरी रस्ता होणार.
- गावालगत रोड डिव्हायडर, दुतर्फा सात मीटरचा काँक्रिट रस्ता, दुतर्फा रेलिंग, दोन्ही बाजूंना बंदिस्त काँक्रिट गटार,फुटपाथ आणि पथदिवे असतील.
- ॲप्रोच रस्ते ५० मीटर लांबीपर्यंत काँक्रिटचे होणार. use
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर होणार* *करमाळा ते जामखेड राज्यमार्ग* *पुढील दोन महिण्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार*. *आशियाई डेव्हलपमेंट बँक प्रकल्पाच्या वरीष्ठ* *अधिका-यांकडून रस्त्याची पाहणी*
*राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर होणार* *करमाळा ते जामखेड राज्यमार्ग* *पुढील दोन महिण्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार*. *आशियाई डेव्हलपमेंट बँक प्रकल्पाच्या वरीष्ठ* *अधिका-यांकडून रस्त्याची पाहणी*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा