*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी जेऊर येथे आयोजित केले बाबतचे वृत्त आमदार कार्यालयाकडून प्रसिद्ध होत असुन, याबाबत सदरची महत्वपूर्ण आढावा बैठक ही करमाळा येथे होणे गरजेचे असलेचे मत करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी व्यक्त केले आहे. तालुक्यातील पाणी टंचाई व दुष्काळ निवारणार्थ आगामी काळात महत्वपूर्ण पाऊले उचलण्यासाठी प्रशासनाला सक्षम करणे गरजेचे असुन, यासाठीची होणारी महत्वपूर्ण आढावा बैठक आमदार साहेबांनी जेऊर येथे न घेता पंचायत समिती सभागृह करमाळा येथे घ्यावी अशी विनंती उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी केली आहे. आमदारांनी कुठे बैठक घ्यावी हा त्यांचे अधिकारातील विषय असला तरी सदरची आढावा बैठक करमाळा येथे घेणे अधिकारी, पदाधिकारी व सर्वांचे दृष्टीने योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शुक्रवारी जेऊर येथे होणारी आढावा बैठक आमदार महोदय करमाळ्यात घेणार का? याबाबत सविस्तरपणे पहावे लागेल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा