Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

भीमा नदीत ४ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सदर पाळीत ४ ते ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, जानेवारीपर्यंत नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



-----: भीमा नदीपात्रातील सिंचन व वीज प्रश्नांसाठी आलेगाव खुर्द येथे शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईने तूर्तास स्थगित करण्यात आले. त्यानंतर शनिवारी पहाटे २ वाजता भीमा नदीत ३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. तर सकाळी ७.३० वाजता विसर्ग वाढवून ४ हजार ५०० क्युसेक करण्यात आला. सदर पाळीत ४ ते ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, जानेवारीपर्यंत नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.

     उजनी धरणातून भीमा नदी पात्रात शनिवारी पहाटे दोन वाजता १४०० क्युसेक्स तर वीज निर्मितीला १६०० असे ३००० क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामध्ये सकाळी साडेसात वाजता वाढ करून ४५०० करण्यात आला. धरणात सध्याला १०५ टिएमसी पाणी साठा आहे.

      सोलापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या समन्वयाने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आलेगाव-भांडगाव बंधाऱ्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. मायनर क्रमांक ५ कॅनॉलची दुरुस्ती होईपर्यंत नदीपात्रात ५० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून, टणू - टाकळी, रुई-भाटनिमगाव व नरसिंहपूर-शेवरे येथील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जातील. तसेच शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यात कपात न करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

       पंढरपूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलन स्थगित केले. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

      उजनीत सध्याला ४१ टीएमसी उपयुक्त साठा

उजनी धरणात सध्या एकूण १०५ टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी ४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. पुढील आठ दिवसांत उपयुक्त पाणीसाठा सुमारे ३५ टीएमसी राहण्याची शक्यता आहे. शनिवारी धरणाची पाणीपातळी ७७ टक्के होती.

     भिमा नदीवरील इंदापूर तालुक्यातील भांडगाव, बावडा, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू आणि नरसिंहपूर तर माढा तालुक्यातील आलेगाव रुई गारा अकोले टाकळी चांदज शेवरे आधी गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. तसेच नदीकाठा वरील गावात असणाऱ्या विहिरी व कुपनलिका यांची पाणी पातळीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी प्रश्न जानेवारीपर्यंत तरी मार्गी लागला असल्याचे बोलले जात आहे. तीनही बंधारे ढापे टाकून पाणी अडवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो - गणेशवाडी येथे कोरड्या पडलेल्या भिमा नदीचे पात्र पाणी सोडल्यानंतर खळखळून वाहू लागले.

-----------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा