*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील शिवगिरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड विहाळ या कारखान्याने 31 ऑक्टोबर 2026पर्यंत गाळपास आलेले उसाचे रुपये- 3151/- प्रतिमेट्रिक टना प्रमाणे ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादकांचे खात्यावर वर्ग केली आहे. तसेच 10.11. 2026पर्यंतचे ऊस तोडणी वाहतुकीचे बिलाची कमिशनसह होणारी रक्कम ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचे खातेवर वर्ग केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व वाहतूक ठेकेदार यांचे कडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यापुढेही गाळपास येणारे उसाचे बिलाची रक्कम पंधरा दिवसाला अदा केली जाईल व ऊस तोडणी वाहतुकीचे बिले दर दहा दिवसाला देण्यात येणार आहेत अशी माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन संजय सावंत यांनी दिली. तरी ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्यासं गळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
ऊस गाळप हंगाम 2026- 27 चे गाळप चेअरमन कालिदास आबा सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय दादा सावंत , किरण तात्या सावंत, व्हॉइस चेअरमन संजय सावंत,संचालक अजिंक्य भैय्या सावंत संचालक सचिन तोडकरी सर कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुरळीत चालू आहे.त्याबद्दल सर्व ऊस उत्पादक ऊस तोडणी ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा