Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा कुऱ्हाडीने खून...

 *सोलापूर ---प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


सोलापूर शहरातील उमा नगरी, 117 परिसरात सख्ख्या भावानेच आपल्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 29 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

संभाजी देवीदास माने वय वर्ष 35 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्याच सख्ख्या भावाने कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे.या प्रकरणी त्याचा भाऊ तानाजी देविदास माने याचे नाव समोर आले आहे. 

संभाजी हा दारू पिऊन आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 

घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णसेवक लादेन यांच्या मदतीने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

मात्र, सख्ख्या भावानेच भावाचा खून नेमका कोणत्या कारणातून केला? या हत्येमागे कौटुंबिक वाद आहे की अन्य काही कारण, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे उमा नगरी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, रक्ताच्या नात्यातील या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणातील पुढील तपास आणि अधिकृत माहिती समोर येताच आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा