Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६

NIBM फॉरेस्ट मधील वृक्ष यापुढे तोडणार नसल्याचे वनविभागाचे लेखी आश्वासन मात्र तोडलेल्या वृक्ष बाबत अद्याप कारवाईचे वनविभागाकडून ‌उत्तर न दिल्याने चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*



NIBM फॉरेस्ट आंदोलन चौथ्या दिवशी; सुरू असून ‌वन विभागाकडून यापुढे झाडे तोडली जाणार नसल्याचे लेखी आश्वासन, घेण्यात आले  मात्र आधीच तोडलेल्या झाडांबाबत कारवाईचे वन विभागाकडून उत्तर आले नाही; त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार असून उद्या  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले


NIBM फॉरेस्ट आणि परिसरातील हरित क्षेत्र वाचवण्यासाठी भीम आर्मी आणि जनशक्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ॲड. तौसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले बेमुदत आंदोलन रविवारी चौथ्या दिवशी पोहोचले. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०२६ रोजी NIBM रोड, पुणे येथे सुरू करण्यात आलेले हे आंदोलन वृक्षतोडीच्या विरोधात आणि वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी सुरू आहे.

या आंदोलनाला परिसरातील स्थानिक नागरिक, विद्यमान व माजी नगरसेवक, आमदार, पर्यावरणप्रेमी तसेच अनेक जागरूक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. NIBM रोडवरील हरित पट्टा आणि वनसंपदा वाचवण्यासाठी विविध स्तरांतील नागरिक एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होत आहेत.

सलग तीन दिवसांच्या आंदोलनानंतर वन विभागाच्या वानवडी विभागाचे प्रादेशिक अधिकारी एन. एस. पाटील, रासकर आणि वनरक्षक जगताप यांनी स्थानिक कोंढवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.

यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापुढे कोणतीही झाडे तोडली जाणार नाहीत, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, यापूर्वी तोडण्यात आलेल्या झाडांबाबत काय कारवाई केली जाणार, संबंधितांवर कोणती जबाबदारी निश्चित केली जाणार आणि वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.

केवळ यापुढे झाडे तोडली जाणार नाहीत, असे आश्वासन देऊन प्रश्न संपत नाही. आधीच तोडण्यात आलेल्या झाडांची जबाबदारी कोण घेणार? दोषींवर काय कारवाई होणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

तसेच वन अधिकारी **श्री. जलिंदर पाटील यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची मागणी** देखील आंदोलकांकडून करण्यात आली. सर्व मागण्यांवर समाधानकारक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्या, सोमवार रोजी रास्ता रोको आंदोलन gheun sadari andolanas patimba denar aahet . राज्य सरकार आणि वन विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच वनसंवर्धनाच्या प्रश्नावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनस्थळी varun बोलताना ॲड. तौसिफ शेख म्हणाले,

"हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे आंदोलन नसून वनजमीन, झाडे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी उभारलेले आंदोलन आहे. वन विभागाने वनजमीन ही स्वतःची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागू नये. वन विभाग हा जनतेला उत्तरदायी आहे आणि नागरिकांना त्यांच्या निर्णयांबाबत प्रश्न विचारण्याचा व पारदर्शकतेची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

यापुढे झाडे तोडणार नाही, असे लेखी आश्वासन देणे पुरेसे नाही. जी झाडे आधीच तोडण्यात आली आहेत, त्यांचे काय? त्यासाठी जबाबदार कोण? दोषींवर कोणती कारवाई होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत आणि ठोस कारवाई होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार."

पुढे नागरिकांना आवाहन करताना ॲड. तौसिफ शेख म्हणाले,

"हा संघर्ष आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. आजपर्यंत झाडे आणि जंगलांच्या पर्यावरणीय भूमिकेची जागा घेऊ शकेल, अशी कोणतीही कृत्रिम व्यवस्था मानवाला निर्माण करता आलेली नाही. हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून जीवनाचा, अस्तित्वाचा आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज आपण शांत बसलो तर त्याची किंमत आपल्या पुढील पिढ्यांना मोजावी लागेल.

वनसंवर्धन ही कोणत्याही एका पक्षाची, धर्माची किंवा समाजाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन NIBM फॉरेस्ट वाचवण्यासाठी पुढे यावे."

आंदोलकांनी स्पष्ट केले की, केवळ आश्वासनांच्या आधारावर आंदोलन मागे घेतले जाणार नाही. वन विभाग आणि राज्य सरकारकडून सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे, यापूर्वी झालेल्या वृक्षतोडीबाबत ठोस कारवाई आणि NIBM फॉरेस्टच्या संरक्षणाची हमी मिळेपर्यंत शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहणार आहे.

**NIBM फॉरेस्ट वाचवण्याचा लढा चौथ्या दिवशीही सुरू असून, या आंदोलनाला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.**


**NIBM फॉरेस्ट वाचवा!**

**झाडे वाचवा!**

**आपले भविष्य वाचवा!**

*ॲड. तौसिफ शेख*

जनशक्ती संघ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा