*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेवरावजी जानकर साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.
हा विराट मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "जोपर्यंत उसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय निश्चित होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून मागे हटणार नाही," अशी ठाम भूमिका नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे.
कष्टकरी बळीराजाच्या घामाचे योग्य मोल मिळण्यासाठी हा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. शासन आणि साखर कारखानदार यावर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा