Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२६

टणू (ता.इंदापूर) येथील शालन पोपट मोहिते व विठ्ठल पोपट मोहिते यांचा तुटून जाणाऱ्या अडीच एकर ऊस विज तारांची ठिणगी पडून जळाला,

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


        टणू (ता.इंदापूर) येथील शालन पोपट मोहिते व विठ्ठल पोपट मोहिते यांचा तुटून जाणाऱ्या अडीच एकर ऊसात विज तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून ऊस जळण्याची घटना घडली आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सावधानता बाळगल्याने आजूबाजूचा ऊस जळण्यापासून वाचल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.




     टणू (ता.इंदापूर) येथे बावडा नरसिंहपूर मार्गालगत शालन पोपट मोहिते व विठ्ठल पोपट मोहिते यांचा तुटून जाणाऱ्या अडीच एकर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये महावितरणच्या विजवाहक तारा लूज असल्याने त्यातून सतत पणाने घर्षण होत असते. यासंदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. तुटून जाणाऱ्या ऊसात विजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून अडीच एकर उभा असलेला ऊस, आयएसआय ट्रेडमार्क असणारी ड्रीप, अडीच इंची सबमेन व तीन इंची मेन लाईन जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे




     दरम्यान यासंदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदर जळालेल्या उसाचे पंचनामा करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून आर्थिक भरपाई देण्याची मागणी शालन पोपट मोहिते व विठ्ठल पोपट मोहिते यांनी केली आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे हात गाईला आलेल्या शेतकऱ्यांना अचानक ऊस जळून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

फोटो - टणू (ता.इंदापूर) येथील शालन पोपट मोहिते व विठ्ठल पोपट मोहिते यांचा तुटून जाणाऱ्या अडीच एकर ऊस जळाला आहे.

-------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा