Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६

"*१० तारखेनंतर आपण एकत्र बसू"; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना, दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा!*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी रात्री त्यांना मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

त्याआधी ते पुण्यातही रूग्णालयातच दाखल होते. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट झाल्याने शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना काय सांगितलं?

दिवाळी झाल्यावर म्हणजे १० तारखेनंतर आपण बसू. असं शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना सांगितलं आहे. अजित पवार यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा प्रफुल पटेल हे त्यांच्यासह गेले. त्यानंतर आता प्रफुल पटेल यांनी ब्रीच कँडी रूग्णालयात जाऊन शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या दरम्यान शरद पवार यांनी १० तारखेनंतर आपण एकत्र बसू असं प्रफुल पटेल यांना सांगितलं आहे. या विधानामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रफुल पटेल यांनी काय प्रतिक्रिया दिली?

शरद पवार यांना थकवा आल्याने त्यांना पुण्यातल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना भेटून मलाही आनंद झाला. राजकारणात काय चाललं आहे त्याची त्यांनी माहिती घेतली. आमची चांगली चर्चा झाली. एक ते दोन दिवसांत त्यांची प्रकृती चांगली होईल आणि ते घरी जातील अशी अपेक्षा आहे. असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

मोदींच्या फोनबाबत काय म्हणाले प्रफुल पटेल?

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे कैक वर्षांपासून चांगले राजकीय संबंध आहेत. दोघांनाही एकमेकांबाबत सन्मान वाटतो, आदर वाटतो. शरद पवारांबाबत मोदींना कायमच आदर वाटतो. तसंच शरद पवारांनाही मोदींबाबत विशेष प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता तर ते योग्यच आहे कारण त्या दोघांचे राजकीय संबंधच तसे चांगले आहेत. असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. UPA चं सरकार होतं आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून या दोघांचे चांगले संबंध आहे असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने आणि शरद पवार यांनी त्यांना आपण १० नोव्हेंबरनंतर एकत्र बसू असं सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरूवात झाली आहे. शरद पवार काही वेगळा निर्णय घेणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होणार का? की आणखी काही घडणार? याची उत्तरं या बैठकीनंतर मिळू शकणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा