*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
-: सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालक शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी पौष्टिक व सकस चारा उपलब्ध व्हावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना मोफत मका बियाणांचे वाटप करण्यात येत आहेत.
पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र शासन पशुचिकित्सालय, कळंब यांच्यामार्फत १०० टक्के अनुदानावर वैरण विकास कार्यक्रमांतर्गत वैरण बियाण्याचे वाटप पशुवैद्यकीय रूग्णालय पिंपरी बुद्रुक येथे पशुपालकांना करण्यात आले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, सुदर्शन बोडके, संतोष सूतार यांच्या हस्ते पशुपालकांना वैरण चाऱ्यासाठी बियाण्याचे वाटप करण्यात आले.
पिंपरी बुद्रुक पशुवैद्यकीय रूग्णालयात वैरण विकास कार्यक्रमांतर्गत १०० टक्के अनुदानावर बियाण्यांचे वाटपावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ग. म. तिकोटे ( अतिरिक्त कार्यभार), प्रविण बोडके, शहाजी बोडके, खुदाभाई शेख आदी मान्यवरांसह पशुपालन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांना बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले.
------------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा