Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६

पंढरपूर येथील ह. भ प भारत जाधव कैकाडी महाराज यांचे श्रीरामपूर नगरीत " शिव शंभो स्वराज्य मोहिमेला किल्ले रायगड वर संविधान दिनी सर्व जाती धर्माच्या अभिवादन करण्यासाठी येण्याचें आव्हान "

 *श्रीरामपूर- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


" संत -स्वराज्य -संविधान " साठी " शिव संभो स्वराज्य रायगड मोहिमे " साठी अगत्याने हजर रहा असे आवाहन पंढरपूर येथील प्रसिद्ध कैलासवासी ह भ प रामदास जाधव कैकाडी महाराज या मठाचे सध्याचे मठाधिपती व त्यांचे पुत्र ह भ प भारत जाधव कैकाडी महाराज " पंढरपूर यांनी यांनी  रविवारी,दि,१५/११/२७ रोजी  श्रीरामपूर शहरातील संत नामदेव महाराज यांच्या मंदिर समोरील आमदार हेमंत तात्या ओगले यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेल्या स्वागत कमांjनीच्या उदघाटन समारंभ प्रसंगी बोलताना केले 



        ‌‌ याप्रसंगी यांच्या हस्ते स्वागत कमानीचे फीत कापून फटाक्याच्या आतिषबाजीत उद्घाटन करण्यात आले 

          संत नामदेव महाराज मंदिरात  अत्यंत उदबोधक शैलीत संत नामदेव महाराजांच्या जीवन प्रवासावरविविध उदाहरनासह उदबोधक माहिती देऊन विद्रोही संस्कृतीक चळवळ नें राबविण्यात आलेल्या किल्ले रायगड येथील 25 व 26 नोव्हेंबर च्या संविधान दिनाचे अवचित्य निम्मिताने " शिव,- संभो- स्वराज्य " मोहिमेबद्दल' " संत -स्वराज्य व संविधान " यावर प्रबोधन करून रायगडावरील रायते चें राजे छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व धर्म समभाव समतेची अभिवादन व वारकरी  लोकांचं समतेचे रिंगन -सोहळा  करण्यासाठी श्रीरामपूर शहरातील जास्तीत जास्त संख्यात येण्याचें आव्हान केलं.


या उदघाटन समारंभात मंदिरात प्रस्तावना व माहिती मंदिर पंच कमेटी अध्यक्ष कैलास खंदारे नी दिली, कार्यक्रमला आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूर पालिकाचें लोकनियुक्त नगराध्यक्ष करण जयंत ससाणे, सचिन गुजर, लकी सेठी, मुहम्मद शेख,निलोफर शेख, दिलीप नागरे, अण्णासाहेब डावखर, शिंपी समाजातील विविध बघीनी व मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती.

             विद्रोही संस्कृतीक चळवळीचें राज्य सचिव डॉ. जालिंदर घिगे, राज्य सदस्य ऍड. कुमार भिंगारे, राज्य सदस्य शाहीर भीमराव कदम, राज्य सदस्य व श्रीरामपूर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष डॉ सलीम शेख, आडवोकेट अमोल सोनवणे, आडवोकेट राजेश बोर्डे, विजय जगताप, संतोष त्रिभुवन, राजु शेख, राजु पठाण, कवी रज्जाक शेख सर, इकबाल काकर सर,  भगवान दादा खरात , ह. भ. प कुऱ्हे सर,भारत शिंदे, सतीश लोंढे, सलीम आली ड्राइव्हर इत्यादी हजर होतें.. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन विद्रोही संस्कृतीक चाळ वळीचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव दिवे सरांनी केलं.

     ह. भ. प भारत जाधव कैकाडी महाराजांनी डॉ सलीम शेख यांच्या बैतुशशिफा हॉस्पिटल निवास्थानी पावन स्पर्श केलं,  स्नेह भेट दिली.  त्या ठिकाणी काव्यमय महेफील रंगली. प्रसिद्ध गझलकार कवी रज्जाक शेख यांनी उत्कृष्ट गझल सादर केली, शाहीर भीमराव कदमानीं एक गीत सादर केलं, ह . भ. प. भारत महाराजांनीं  , अंतरराष्ट्रीय उर्दू शायर कवी राहत इंदोरी, शकील बदायुनि, मुन्नावार रांना व विविध उर्दू कवी शायरांच्या कविता व -शायरी बरोबर अभंगाचीं सांगड घालून एक वेगळ्याच विश्वात घेऊन जावून एका उपक्रमावर प्रयोग करून टाळ्या मिळवल्यात..

त्याठिकाणीउपस्थित असलेल्या विद्रोही संस्कृतीक चळवळीच्या श्रीरामपूर व जिल्हा भरातील सर्व सदस्यांनी मनमुराद आनंद लुटला.

बैतुशशिफा हॉस्पिटल चें डॉ सलीम शेख यांनी ह. भ. प. भारत जाधव - कैकाडी महाराजांचे  पवित्र कुर आन चीं मराठी भाषांतर अवृत्ती सप्रेम भेट देऊन हॉस्पिटल वर  वेळ काढुन भेट दिल्या बद्दल विशेष आभार मानले.

ह. भ. प. भारत महाराजांचें श्रीरामपूर शहरातील विद्रोही संस्कृतीक चालवळीतील सदस्यांना " संत स्वराज्य व संविधान" मोहिमेला येण्याचं विशेष आव्हान देऊन दौऱ्याची यशस्वी सांगता  केली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा