Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२६

दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उजनी धरण परिसरातील शेतकरी तसेच मच्छीमार बांधव चटणी ठेचा भाकरी खाऊन करणार आगळे वेगळेआंदोलन

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीची धूमधाम चालू असताना उजनी परिसरातील शेतकरी बांधव मात्र चटणी ठेचा भाकरी खाऊन उजनी जलाशयावरील चार विनाशकारी प्रकल्प विरोधात आंदोलन करणार आहे, अशी माहिती उजनी परिसरातील शेतकरी अविनाश सरडे यांनी दिली

 याबाबत अधिक माहिती देताना सरडे म्हणाले की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर उजनी जलाशयावरील ए आय डेटा सेंटर तसेच इतर विनाशकारी प्रकल्पा विरोधी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर चटणी ठेचा भाकरी खाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती उजनी परिसरातील शेतकरी सरडे यांनी बोलताना दिली

ऐन दिवाळीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी पाडव्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता भीमा नगर येथे उजनी परिसरातील शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांच्या वतीने एक दिवशीय चटणी ठेचा भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे उजनी हे आमच्या उजनी परिसरातील शेतकऱ्यांचा आत्मा असून या जलाशयावर कोणताही शेतकऱ्यांना देशोघडीस लावणारा कोणताही विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही या प्रमुख मागणीसाठी आम्ही उजनी परिसरातील शेतकरी तसेच मच्छीमार बांधव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पाडव्याच्या दिवशी चटणी तिचा भाकरी आंदोलन करणार आहे भविष्यात चटणी भाकर खाण्याचे वेळ येऊ नये म्हणून उजनी प्रकल्पग्रस्त तसेच मच्छीमर बांधव यांनी एकत्रित येऊन सदरचा चटणी ठेचा भाकर आंदोलनाचा पवित्रा उचलला असून पाडव्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता भिमानगर येथे सदरचे आंदोलन होणार असून या आंदोलनामध्ये उजनी धरणग्रस्त परिसरातील शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलनामध्ये हजार संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सरडे यांनी शेवटी बोलताना केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा