Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२६

तामलवाडीच्या श्री विष्णू महादेव मंदिराला 'क' दर्जा मिळावा; नोंदणीकृत ट्रस्ट, वार्षिक ऑडिट आणि ग्रामपंचायत जागेची नोंदही निवेदनात* *माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांची मागणी*

 *तामलवाडी --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--9730867448*


तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील श्री विष्णू महादेव मंदिर हे पंचक्रोशीतील अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान असून, या मंदिराची महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून तांत्रिक सर्वेक्षण करून *"क" दर्जा* मध्ये नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सैनिक *श्री सावंत शिवाजी रामकृष्ण* यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. आशिष शेलार, पालकमंत्री मा. ना. प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी धाराशिव, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर आणि प्रशासक / ग्रामसेवक ग्रामपंचायत तामलवाडी यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.

*मंदिराची कायदेशीर नोंदणी पूर्ण*

निवेदनात यावेळी मंदिराच्या कायदेशीर नोंदणीची महत्त्वाची माहितीही नमूद करण्यात आली आहे.

हे मंदिर, *मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० (सन १९५० चा मुंबई अधिनियम क्रमांक २९)* या अन्वये सहाय्यक धर्मादाय आयुक्त, धाराशिव विभाग, धाराशिव यांच्याकडे *"श्री त्रिंबकेश्वर देव तामलवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद"* या नावाने सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था म्हणून नोंदण्यात आले आहे.

*नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक: A-0003081(OSM)*

*दिनांक: ११ मार्च २०२४*

या नोंदणीकृत संस्थेचे *प्रतिवर्षी ऑडिट* केले जाते, त्यामुळे मंदिराचा कारभार पारदर्शक आणि नियमाप्रमाणे चालतो, असेही निवेदनात म्हटले आहे.

*ग्रामपंचायत ८ अ मध्ये जागेची नोंद*

या नोंदणीकृत मंदिराची ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी, तालुका तुळजापूर येथे *८ अ प्रमाणे मिळकत क्रमांक ८२* मध्ये नोंद आहे.

*जागा: ३७८० स्क्वेअर फूट (९०" X ४२")*

ज्या ठिकाणी श्री विष्णू महादेवाचे भव्य मंदिर आहे, ती जागा पूर्वी ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडीची जागा होती. ही जागा *दिनांक ११ मार्च २०२४ च्या पूर्वीपासून वरील संस्थेस देण्याकरिता ठराव मंजूर* झालेला आहे, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

त्यामुळे मंदिर हे केवळ श्रद्धेचे ठिकाण नसून, *कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत, ऑडिट असलेले आणि ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद असलेले देवस्थान* आहे, हे यातून स्पष्ट होते.

*यादवकालीन, हेमाडपंती स्थापत्यशैलीचा वारसा*

सोलापूर-तुळजापूर महामार्गावर असलेल्या तामलवाडी गावाचे श्री विष्णू महादेव मंदिर हे मुख्य ग्रामदैवत आहे. मंदिराची रचना आणि परिसरातील अवशेषांवरून हे मंदिर *यादवकालीन किंवा हेमाडपंती स्थापत्यशैलीच्या काळातील* असण्याची शक्यता स्थानिक इतिहासकार वर्तवतात.

*हरी-हर ऐक्याचे अनोखे प्रतीक*

तामलवाडी येथील मंदिरात विष्णू (हरी) आणि महादेव (हर) या दोन्ही संकल्पना एकत्र पाहायला मिळतात, जे *'हरी-हर' ऐक्याचे प्रतीक* मानले जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेनुसार हे स्थान भाविकांच्या नवसाला पावणारे अत्यंत जागृत देवस्थान आहे.

*श्रावण महिना आणि वार्षिक यात्रा महोत्सव*

श्रावण महिन्यात येथे विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाच्या पिंडीवर आणि विष्णू रूपावर आकर्षक पूजा व अभिषेक केला जातो

दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात (मार्च-एप्रिलच्या सुमारास) होणारा *वार्षिक यात्रा महोत्सव (ग्रामोत्सव)* हा येथील सर्वात मोठा उत्सव असतो. यामध्ये देवाचा पालखी सोहळा आणि छबिना निघतो, तसेच भजन, कीर्तन, धार्मिक विधी आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

*निधीमधून कोणती कामे अपेक्षित?*

जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र शासन मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करून मंदिराच्या दुरुस्ती व देखभालीसाठी भरीव निधी मिळावा, अशी मागणी आहे. निधी मिळाल्यास:

- *शिवरत्न नगर ते मंदिर मुख्य रस्ता दुरुस्ती*

- *मंदिर परिसर सुशोभीकरण*

- *विद्युतीकरण आणि पाणी सुविधा*

- *भाविकांसाठी सिमेंट काँक्रीट / पेव्हर ब्लॉक पार्किंग*

- *पार्किंगमध्ये स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व स्नानगृहाची व्यवस्था*

ही प्राथमिक कामे करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

*गावकऱ्यांना न्याय मिळावा*

तामलवाडी गावचे ग्रामस्थ व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून गावकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

नोंदणी, ऑडिट आणि जागेची कायदेशीर नोंद असल्यामुळे या मंदिराला 'क' दर्जा मिळणे अधिक सोपे होईल आणि गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा