इंदापूर तालुका -प्रतिनिधी
एस बी तांबोळी.
मो.-8378 081 147
: आपणाला इंदापूर तालुक्यातील जनतेने मनापासून प्रेम व साथ दिली आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याच्या दिलेल्या संधीमुळेच आपण तालुक्यात गावोगावच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणू शकलो असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
वडापुरी (ता. इंदापूर) येथे जवळपास 20 कोटी 70 लाख रुपयांच्या विकासा कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार भरणे यांच्या हस्ते 18 ऑगस्टला संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते.
आमदार दत्तात्रय भरणे बोलताना पुढे म्हणाले, जनतेने साथ दिल्याने आपण कोट्यावधी रुपयाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शासनाच्या माध्यमातून आणू शकलो. यामुळे गावोगावच्या रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्याच्या व शाळांच्या सुविधा व इतर सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊ शकलो. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, हर घर जल योजनेच्या माध्यमातून पाणी शेवटच्या घटकापर्यंत मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल. तालुक्यात योजना मोठ्या प्रमाणात आणायच्या असून राहिलेली अपुरी कामे मोठ्या प्रमाणावर निधी आणून आपण पुर्ण करणार आहे. असेही श्री भरणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रदिप गारटकर यांनी श्री भरणे यांच्या आमदार व मंत्री पदाच्या काळातील कामाचे कौतुक केले. 40 वर्षात तालुक्यात यापूर्वी कधी झाले नसेल एवढे काम श्री भरणे यांनी अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत केले असल्याचे गारटकर म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप (आबा) पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, युवा नेते दिपक जाधव, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, बाळासो करगळ, सचिन सपकाळ, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा