इंदापूर तालुका -प्रतिनिधी
एस बी तांबोळी.
मो.-8378 081 147
- इंदापूर तालुक्यातील गोंदी - ओझरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. योगीता राजेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे होत्या. निवडणुकीची प्रक्रिया ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी पार पाडली.
गोंदी - ओझरे ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच सौ कामिना विठ्ठल खटके यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे यांनी भुषविले. यावेळी झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सौ. योगीता राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडी प्रसंगी सौ सविता अंगद देशमुख, अर्जुन अंगद पालवे, विलास महादेव सुळ, युवराज चंद्रकांत डांगे, विलास उत्तम रास्ते, कामीना विठ्ठल खटके, रीता दीपक बनसोडे, युवानेते रणजित वाघमोडे, प्रगतशील बागायतदार विलास जाधव, माजी सरपंच दिलीप हजारे, अंगद देशमुख, भारत पालवे, राजेंद्र पवार, विठ्ठल पवार, हरिदास पवार, संतोष शिंगाडे, अमोल सुळे, शशिकांत शिंदे, जितेंद्र चव्हाण, सचिन सुळ आदि मान्यवर उपस्थित होते.
फोटो - गोंदी ओझरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. योगीता राजेंद्र पवार यांची बिनविरोध निवड.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा