टेंभुर्णी----प्रतिनिधी
मुकुंद -रामदासी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9960 202 630
इतर एफ आर पी पेक्षा ५० रुपये जास्त देणारा एकमेव कारखाना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असून सन 2022 -2023 हंगामात गळीतास आलेल्या उसाला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्या तर्फे 150 रुपयाचे अंतिम बिल 1 सप्टेंबर 23 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे जिल्हा परिषद सदस्य शंभुराजे मोरे शिवाजीराव पाटील तसेच प्रमोद कुटे दत्ता सुर्वे संतोष पाटील आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की आज पर्यंत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन मध्ये मागील हंगामात गाळप झालेल्या 23 लाख 91 हजार मेट्रिक टन उसाला 2550 रुपये प्रति टन रक्कम दर दिलेला आहे व आता 1 सप्टेंबर रोजी 150 रुपये अंतिम बिल हप्ता देण्यात येत आहे. कारखान्याची एफआरपी रक्कम 2650 रुपये आहे ,परंतु एफआरपी पेक्षा 50 रुपये प्रति टन जादा दर शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मागील हंगामात हंगामअखेरच्या महिन्यात 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत गळीतास आलेल्या उसाला 75 रुपये प्रति टन जादा तर एक मार्चपासून हंगाम संपेपर्यंत आलेल्या उसाला प्रति टन 150 रुपये ज्यादा दर दिलेला आहे ,त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 2775 ते 2850 रुपये प्रति टन दर मिळाला आहे .
आगामी हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूकदारांना दोन लाख रुपये ऍडव्हान्स पेमेंट दिले आहे शिवाय 1000 ट्रॅक्टर 1000 बैलगाड्या व 700 बजेट अशा ऊस वाहतूकदारांना 90 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आगामी गळीत हंगामाची तयारी पूर्ण झालेली असून या हंगामासाठी 45 हजार हेक्टर ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे . एफ आर पी पेक्षा पन्नास रुपये ज्यादा दर देणारा जिल्ह्यात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अव्वल ठरला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा