संपादक------ हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
नेवरे ता.माळशिरस जि. सोलापूर येथे लोकशाहीर "आण्णाभाऊ साठे" यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा.नरेंद्र भोसले होते, या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवासा बाबत माहिती सांगताना प्रा.नरेंद्र भोसले म्हणाले की सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव ते रशिया पर्यतचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला, मुंबई ही महाराष्ट्राची आहे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांनी उभी केली होती,
त्यांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करु नका असे परखड मत व्यक्त केले,
यावेळी गांवचे सरपंच राजाराम झुरूळे, डॉ.नष्टे, डॉ.माने, पोलिस पाटील पांडुरंग पाटील, शेतकरी संघटनेचे सिराज तांबोळी मुकूंद पाटील, गजानन पाटील, . शिवाजी ठोकळे दयानंद पाटील, विनोद इनामदार, समाधान नाईकनवरे, आदी मान्यवर उपस्थित होते
डॉ.नष्टे यांनी ही फकीरा कांदबरी व लोकशाही आण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सखोल भाषण केले.
यावेळी अनेक लहान मुलींनी परखड भाषणे केली.
या जयंती उत्सवाचे आयोजन डॉ.नितीन साठे व समाधान साठे व लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी नेवरे यांनी आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नितीन साठे यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा