संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो.-9730 867 448
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने नागपंचमीनिमित्त" पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या सिनेट सदस्य- पद्मजादेवी मोहिते पाटील सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष -डॉ.धवलसिंह मोहिते पाटील , आणि प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 ,20 व 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी निमित्त महिला व युवतींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी "नागपंचमी "उत्सवाचे आणि विविध स्पर्धांचे आयोजन धवल श्रीराम मंदिर इंदापूर रोड अकलूज येथे केले आहे
या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा (घरून बनवून अथवा रेसिपी लिहून आणणे ) मेहंदी स्पर्धा ,हेअर स्टाईल स्पर्धा, मेकअप स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा , टॅलेंट कॉन्टेस्ट, डोळे बांधून फोटोला टिकली लावणे ,स्मरणशक्ती खेळ स्पर्धा, भरतकाम ,विणकाम, पारंपारिक उखाणा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, नागपंचमी स्पेशल पारंपारिक फेर गाणी स्पर्धा , तसेच कोण होणार पैठणीचे मानकरी अशा विविध स्पर्धाचे आयोजन केले असून त्या संदर्भात सोबत कार्यक्रम पत्रिका दिली या पत्रिकेत सर्व माहिती दिलेली आहे तरी अकलूज आणि परिसरातील महिला व युवतीने या कार्यक्रमात सहभागी घेऊन विविध स्पर्धेच्या बक्षिसांचे मानकरी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन "जनसेवा संघटना" च्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा