मुख्य संपादक--- हुसेन मुलाणी
टाइम्स- 45- न्यूज मराठी नेटवर्क
मो.---9730 867 448
"राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया माढा लोकसभा "अध्यक्षपदी- दसुर ता. माळशिरस जि. सोलापूर येथील ऋषिकेश सावंत पाटील यांची नियुक्ती केल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील यांनी नुकतेच दिले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रेंड चे जिल्हाध्यक्ष बापू पाटील दसुर गावचे ऋषिकेश सावंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया फ्रंट माढा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र सुरज चव्हाण यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यात ऋषिकेश सावंत पाटील यांनी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे काम आहे त्यांचे संघटन कौशल्य व वक्तव्य चांगले असल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने विश्वास टाकून "सोशल मीडिया माढा लोकसभा" अध्यक्षपदी- निवड केली आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या आचार विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ऋषिकेश सावंत पाटील यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा