राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडे ईमेलद्वारे पाठविला असल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.
राजीनामा पत्रामध्ये किरण साठे यांनी वयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे,मात्र हे कारण न पटणाऱ्या असून त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोलापूर जिल्ह्यात जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिवंत ठेवण्यामध्ये किरण साठे यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी हा निर्णय घेण्या मागचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची अकलूजमधील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती.शरद पवार यांच्या बरोबर किरण साठे कुठेही दिसले नाहीत,शरद पवार यांना अकलूज मधून मोठा धक्का बसल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यातील जनतेमधून चालू आहे.
किरण साठे पुढची भूमिका काय घेणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत की राजकारणातून अलिप्त राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा