Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

सभा संपन्न

 "सद्गुरु गहिनीनाथ अर्बन बँके" ची वार्षिक सभा खेळीमेळीच संपन्न सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर.


माळीनगर--- रितेश पांढरे

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9922 434 363

           सदगुरू गहिनीनाथ अर्बन को- ऑप बँक,अकलूज या बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

             माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालय येथे रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजी सदगुरू गहिनीनाथ अर्बन बँकेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन डॉ.अरविंद गांधी हे होते.प्रारंभी बँकेचे सभासद धनंजय शिंदे यांचे हस्ते श्री गहनीनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

        यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन शिरीष फडे, संचालक डॉ.विठ्ठल कवीतके,अजित गांधी,सन्मती सोनाज,डॉ.मिलिंद खाडे,भरतेश वैद्य,निलेश गिरमे,मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे,ऍड. मोहन शेंडगे,बँकेचे अधिकारी मनोज मंगरुळे,राहुल देशपांडे ,हरिदास कांबळे,किशोर कुलकर्णी,महादेव बंडगर,सर्व कर्मचारी व सभासद उपस्थित होते. 

या सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना बँकेचे चेअरमन डॉ.अरविंद गांधी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.यावेळी बँकेचे चेअरमन डॉ.अरविंद गांधी बोलताना म्हणाले,चालू आर्थिक वर्षात बँकेला ६२.७१ लाख इतका नफा झालेला असून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. बँकेकडे ३२.५९ कोटीच्या ठेवी असून १८.२४ कोटीचे कर्ज वाटप केले आहे तसेच बँकेकडे १.४६ कोटी शेअर भांडवल असून स्वनिधी ९.५९ कोटी इतका आहे.

            बँकेचा चालू वर्षात 0 टक्के एन पी ए असून बँकेच्या विकासात मोलाची कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे यांचा सत्कार बँकेचे चेअरमन अरविंद गांधी यांनी यावेळी केला.बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना बॅगेचे वाटप करण्यात आले.

     बँकेचे अधिकारी संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले तर चेअरमन डॉ अरविंद गांधी यांनी आभार मानले.


फोटो :-

 सदगुरू गहिनीनाथ अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी डॉ.अरविंद गांधी, शिरीष फडे,डॉ.विठ्ठल कवितके,अजित गांधी,सन्मती सोनाज,डॉ.मिलिंद खाडे,भरतेश वैद्य,निलेश गिरमे,नंदकुमार गोरे,संजय कुलकर्णी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा