15 महिन्यात क्रुड तेल 31 टक्के स्वस्त ---तेल कंपन्यांना 31 हजार कोटीचा नफा--- तरीही पेट्रोल डिझेल स्वस्त का नाही?
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी करत दिलासा दिला. तथापि, सामान्य माणसाची दुसरी सर्वात मोठी गरज असलेल्या पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या १५ महिन्यांपासून जसेच्या तसे आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी शेवटच्या वेळी २१ मे २०२२ रोजी पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क घटवले होते. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर ९.५ रु. आणि ७ रुपयांनी कमी झाले होते. तेव्हा कच्चे तेल १०९.५१ डॉलर प्रति बॅरल होते. त्यानंतर जून २०२३ मध्ये दर ३१.५७% घसरून ७५ डॉलरच्या खाली आले. मात्र, पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले नाही. कंपन्यांचे म्हणणे आहे की, २०२२ मध्ये महागडे कच्चे तेल खरेदी करून पेट्रोल-डिझेल तयार करताना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. आता त्याची भरपाई करणे सुरू आहे. २०२२-२३ च्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये तिन्ही सरकारी तेल कंपन्यांना १६,७०० कोटींचा तोटाही सहन करावा लागला होता.
आता चित्र बदलले आहे. २०२३-२४ च्या एप्रिल-जून तिमाहीत या तेल कंपन्यांना ३१,१५९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जाणकारांच्या मते, तेल कंपन्यांकडूनउर्वरित. पान ६
दोन्ही इंधनांचे दर तत्काळ ५ रुपयांनी कमी करता येतात...
(भास्कर एक्स्पर्ट मदन सबनवीस, चीफ इकॉनॉमिस्ट, बँक ऑफ बडोदा अनिल भन्साळी, कार्य. संचालक, फिनरेक्स ट्रेझरी)
सरकारसाठी महागाई कमी करणे सर्वात मोठा मुद्दा आहे. दिल्लीत सध्या पेट्रोल ९६.७२ रु. आणि डिझेल ८९.६२ रु./लिटर आहे. अशा वेळी दोन्ही इंधनांचे दर ५ रुपये प्रतिलिटरपर्यंत कमी केले जाऊ शकतात. वस्तुत: तेल कंपन्यांना एक वर्षापासून कच्चे तेल खरेदी करताना अधिक नफा झालेला आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीमध्ये जगात कच्चे तेल १३१ डॉलर प्रति बॅरल होते, पण रशियाहून भारताला ९९ डॉलरवर मिळाले. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल-जूनदरम्यान सौदी अरेबिया व यूएई ८६ डॉलर प्रति बॅरल दराने भारताला तेल विकत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात ते ७७.७ डॉलर होते. भारताने हेच तेल रशियाकडून ७० डॉलरपेक्षाही कमी दराने घेतले आहे. म्हणजेच तेल कंपन्यांना अजूनही ८.८ डॉलर प्रति बॅरल इतक्या सवलतीच्या दराने हे तेल मिळत आहे. स्वत: केंद्रीय पेट्रोलियममंत्री डॉ. हरदीपसिंह पुरी यांनीदेखील तेल कंपन्यांना दर कमी करण्यास यापूर्वीच सांगितले आहे.
सर्वाधिक कर आंध्र प्रदेशमध्ये, सर्वात कमी गुजरात राज्यात
पेट्रोलवर सर्वाधिक २९.१२ रु/लि. कर आंध्रात आहे. सर्वात कमी उत्तराखंडमध्ये १३.१४ रु./लि. डिझेलवर सर्वाधिक कर तेलंगणात २०.६६ रु./लि. सर्वात कमी ११ रु./लि आसाममध्ये. विधानसभा, सार्वत्रिक निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा सर्वात कमी कर घेणाऱ्या राज्यांमध्ये समाविष्ट.
सौजन्य ;--
वार्ताहर ---आवाज महाराष्ट्राचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा