Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

गरिबाला स्वावलंबी, श्रीमंत, बनविण्यासाठी बागवान बांधवांचे कार्य अनुकरणीय ----बागवान पॅटर्न राबवणे काळाची गरज-- इकबाल मुल्ला.

 


संपादक ------हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

                        बागवानांचा मधाळ - रसाळ आंबा जसा "गोड" असतो त्याप्रमाणे माणसाच्या , "दिनचर्येत" एकोपा - आपुलकी -आणि सहकार्याचा मिलाफ घडवत , गरजू व गरिबांना आत्मनिर्भर बनवून त्यांना "श्रीमंत" करून , त्यांना आयुष्यभर "माणुसकीची श्रीमंती प्रदान करणाऱ्या आणि लोकांच्या संसारामध्ये गोडी व आनंद देणाऱ्या "बागवान बांधवाचे" कौतुक करण्याचा "मोह" आज मला आवरत नाही .

बागवान समाजाचे सर्वसाधारण 1800 च्या सुमारास *हजरत औरंगजेब राजांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात पदार्पण झाले . सांगली ,सातारा ,कोल्हापूर व इतरस्त्र ठिकाणी रोजी - रोटी साठी आलेला हा बांधव आज समाजाच्या आणि भारताच्या विकासाचा केंद्रबिंदू झाला आहे . 

बिहार मध्ये कुंजडा ,आणि उत्तरप्रदेश मध्ये राईन या नावाने बागवान समाज ओळखला जातो .

पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांच्या मार्फत फळे -भाजीपाला घाऊक विकत घेऊन सकाळपासून दुपारपर्यंत पुरुष फळे -भाजीपाला यांचा व्यवसाय करत . त्यानंतर संध्याकाळ पर्यंत घरातील महिला तो व्यवसाय सांभाळीत . अपार कष्ट ,तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ आणि सचोटीबद्ध कामामुळे बागवान समाज लोकांच्या गळ्यातील "ताईत" बनले.

बागवान समाजाचे लक्षवेधी कार्य !

बागवान समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी या बांधवानी ट्रस्ट ,व संस्थांची उभारणी केली आहे. एखादा गरीब असेल तर त्याला विनाजामीन , बिनव्याजी कर्जाची सोय केली जाते . प्रत्येक महिन्याला तो गरीब व्यक्ती नित्यनियमाने त्या पैशाची परतफेड करतो व आत्मनिर्भर बनतो . उच्च गुणवत्ता असणाऱ्या घरातील ,गरीब विध्यार्थी असेल ,तर त्या विद्यार्थ्याला दत्तक घेतले जाते . त्याचा संपूर्ण "खर्च" ट्रस्ट उचलते . भविष्यात तोच विद्यार्थी समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देतो . बागवान समाजातील प्रत्येक घरात एक "डबा" दिला जातो . दानधर्म" केलेल्या पैशातून गरीब समाजबांधवांची सोय केली जाते . 

त्याशिवाय तलाक होऊ नये म्हणून लोक कोर्टात जातात. तसे होऊ नये म्हणून सामंजस्याने विषय समाप्त व्हावा , म्हणून तशी सोय ट्रस्ट मार्फत केली जाते . त्यांना समुपदेशन केले जाते . व कोर्टाच्या पायरीपासून त्यांना परावृत्त केले जाते . शिवाय मोफत - "सार्वजनिक विवाह" आयोजित केले जातात . समाजात विधवा असतील त्यांना प्रत्येक महिन्याला रेशन दिले जाते . 

विवाहात प्रचंड खर्च होत असतो ,म्हणून कमी खर्चात विवाह करण्याचे समुपदेशन केले जाते . नमाजपठण करून अतिरिक्त उदर्निवाहासाठी मस्जिद मध्ये नमाज अदा करणाऱ्या इमाम यांना बिनव्याजी कर्जाची सोय केली जाते . 

या व्यतिरिक्त कित्येक वेळा मयत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक यायचे असतात . अशावेळी त्यांच्यासाठी शव शीतगृहच्या "पेटी" ची व्यवस्था केली जाते . समाजात कोणी व्यक्ती गरजवंत आहे का , शिक्षणापासून वंचित आहे का याची माहिती काढली जाते .व त्यांना "मदत" केली जाते .

 "शादीखाना" च्या माध्यमातून गरीब कुटुंब असेल तर कमी पैशात हॉल भाड्याने दिला जातो . प्रसंगी गरीब व्यक्तींसाठी मोफत हॉल भाड्याने दिला जातो .

 इचलकरंजी येथे प्रसिद्ध उद्योजक - लोकप्रिय नेते आणि बागवान समाजाचे अध्यक्ष कैस बागवान यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात समाजकार्य सुरु आहे .

"सांगलीत" माझे हितचिंतक , बागवान समाजाचे "अध्यक्ष" माजी नगराध्यक्ष महंमदअली बागवान यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांची उल्लेखनीय प्रगती होत आहे . महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात बागवान बांधवानी "समाजकारणाची" थक्क करणारी बांधणी केली आहे .


सन्माननीय बागवान बांधवांचे "अतुलनीय" कार्य !

सांगली जिल्ह्यात बागवान समाजाने अतुलनीय कार्य केले आहे . अनेक सन्माननीय नावे कदाचित अनावधानाने राहिली असतील .तरी ,सर्वप्रथम विष्णू अण्णा फळ मार्केट च्या उभारणीसाठी अविरत झटणारे फकीरमहंमद चांद बागवान, अस्लम बागवान ,महंमद बागवान , हाजी मुसाभाई बागवान ( अमीर साहेब ) ,गुलाब अली बागवान , माझे हितचिंतक जमील शमशोद्दीन बागवान (नगरसेवक , मिरज ), मैनुद्दीन शमशोद्दीन बागवान (माजी महापौर ), महंमद अली बागवान, जी .महंमद बाबाजी बागवान ,बाबुभाई आबालाल बागवान ,पैलवान आबालाल हुसेनभाई ,माझे वर्गमित्र समीर - जमीर फकीर बागवान इरफान बागवान , जब्बार बागवान ,आप्पाचांद बागवान ,शब्बीर (सर ) बागवान ,इस्माईल बागवान , बालेचांद बागवान, हारूण बागवान , अशा अनेक प्रतिष्ठित नावाने सांगलीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . 

त्याशिवाय होलसेल भाजी मार्केट चे सन्माननीय "इम्तियाज बागवान" ,मुसा बागवान ,गफ्फार बागवान , अबू खलिफा ,अनिस बागवान , इर्शाद पखाली, जावेद तांबोळी यांचेही उल्लेखनीय योगदान

 सांगलीकरांना मिळत आहे .

बागवान बांधवांच्या मदतीचा या कृतीचा आदर्श समस्त ,सर्व धर्मियांनी आवर्जून घ्यावा. असे झाले तर सर्वधर्मीय सर्वच समाजाची सर्वांगीण प्रगती- -उन्नती होईल . आदर्शवत अशा या "बागवान पॅटर्न" चा "अवलंब" सर्वत्र होईल ही "आशा" आहे . धन्यवाद ! 


आ .इकबाल मुल्ला ( पत्रकार)

संपादक - सांगली वेध ,सांगली ,

संपादक - वेध मीडिया न्यूज ,

सांगली . मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा