Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

जाधव वस्ती ते शंकर महाराज मंदिर रस्त्याबाबत आ. " रणजित सिंह मोहिते पाटील" यांना निवेदन


         अकलूज -प्रतिनिधी लक्ष्मीकांत.कुरुडकर                                     मो . 70 20 665 407

                अकलूज नगरपरिषद हद्दीतील माळेवाडी ते बाराभाई गट येथील जाधव वस्ती, टिळेकर वस्ती, हिवरकर वस्ती ते शंकर महाराज मंदिर, हा रस्ता कच्चा असून भाविक व नागरिकांना येण्या जाण्यास खूप कसरत करावी लागत आहे पाऊस पडल्यानंतर तर या मार्गात मोठ्या प्रमाणात चिखल व दल दल होते आणि हा रस्ता अंदाजे 700 ते 900 मीटर असून तो रस्ता खडीकरण व डांबरीकरण करून मिळावा सदर रस्ता कच्चा असल्यामुळे या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते तरी या रस्त्यासाठी खासदार निधीतून 10,0000 रुपये निधी आला असून तो नगर परिषदेकडे वर्ग झालेला आहे परंतु या रस्त्यासाठी हा निधी अपुरा आहे तरी आपल्या आमदार निधीतून 10,0000 रुपये निधीची तरतूद करावी अशी मागणी अकलूज माळेवाडी नगर परिषद हद्दीतील बाराभाई गट व हनुमान नगर येथील नागरिकांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आणि आपल्या आमदार निधी उपलब्ध झाला तरच हा रस्ता संपूर्ण तयार होईल असेही निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी विजयकुमार लक्ष्मण नेवसे, विजय कुमार रामचंद्र जाधव, विशाल अरविंद जाधव, अमित चंद्रकांत टिळेकर ,अभिजीत विलासराव टिळेकर, दत्ताञय एकतपूरे ,सतीश बाबुराव भगत, इत्यादी नागरिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा