संपादक------ हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच आज रक्षाबंधनच्या अगोदर मुलांना राखी निर्मिती कौशल्य यावे या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक मुले नं.४ शाळा, लोणार गल्ली अकलूज या शाळेतील शिक्षकांनी मुलांना राख्या बनवण्याचा कौशल्य प्राप्त करुन देत उपक्रम राबवण्यात आला. यामधून मुलां मध्ये असणारे सुप्त कलात्मक दृष्टिकोन वेगवेगळ्या राख्यां मध्येउतरले.त्या दृष्टीने बनवलेल्या राख्यांचा सदुपयोग व्हावा आणि मुलांना पुस्तकी ज्ञानासह व्यावसायिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी नाम मात्र दरात त्याच राख्यांची विक्री शाळेमध्ये" खरी कमाई " प्रमाणे करण्यात आली.अतिशय माफक दरात म्हणजे अवघे २ रुपयाला एक या राखी या दराप्रमाणे राख्यांची विक्री करण्यात आली आणि खरेदीसाठी पालकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून स्वावलंबनाचा एक अतिशय छान संदेश समाजात देण्याचा प्रयत्न करण्यात आला..
त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनाही हा संदेश मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत होता असे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये नेहमी सुरू असतात. , या सुंदर उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक हमीद मुलाणी सर, सतीश जाधव सर, . आशा गायकवाड मॅडम, .मनीषा भोसले मॅडम, या शिक्षकांचे सहकार्य लाभले.असेच वेगवेगळे उपक्रम शाळेत आणखी राबवण्याचा शिक्षकांचा मानस दिसून आला. आणि शिक्षणासह विद्यार्थ्यांना व्यवसायिक ज्ञान प्राप्त करुन देण्यासाठी तत्पर आसलेल्या ,मुख्याध्यापक व शिक्षकांचे -पालकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा