संपादक हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 868 448
सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस.धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा तालुक्यातील राजुरी,सावडी,भराटेवस्ती, कोर्टी,विहाळ,वंजारवाडी गावभेट व संवाददौरा संपन्न झाला.
आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजना व धोरणांची माहीती देत केंद्र सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
मतदारसंघातील जनता ही मोहिते-पाटील परिवारातीलच सदस्य असल्याने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत .धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेटी घेतल्या.
तसेच या गावभेट दौऱ्यांच्या प्रसंगी .धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांच्या समवेत संवाद साधला.त्यांच्या अडी-अडचणी प्रश्न जाणून घेतले व आगामी काळात देखील भारतीय जनता पार्टी मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा