टाइम्स 45 न्युज मराठी नेटवर्क
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या इतर भुमिका विचार त्यांचे हिंदुत्ववादी विचार त्यांचे जहाल मवाळ स्पष्ट मत मतांतरे या विषयावर आम्हाला काही देणे घेणे नाही किंवा त्यावर चर्चा मत देणे उचित होणार नाही सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली त्यांना झालेल्या काळया पाण्याची शिक्षा यामध्ये सवलत मिळवली या बाबत देशात अनेकदा रणकंदन झाले त्यांच्यावर टीकेची झोड उठवली त्यांना स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर ही काही प्रस्थापित टीकाकार यांच्या टीकेला सामोरे जावे लागते बाकी या सर्व गदारोळात वा वादात न पडता सावरकर हे आम्हाला जवळचे एवढ्या साठी वाटतात ते म्हणजे त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर ओजस्वी शब्द अलंकारांनी जी क्रांतिकारक व प्रत्येकाला अभिमान व गौरव वाटावा अशी त्यांनी लिहिलेली देशभक्त पर गीत ती गीत आजही टवटवीत प्रसन्न मनाला मोहित करणारी भाषा आहे ती गीत ऐकताना म्हणताना जे मनाला चैतन्याची अलगद न कळत भुरळ घालते ती गाणी म्हणजे अमृत कुंभ आहे जयो स्तुते श्री महणमंगले शिवा स्तुते
तसेच हे हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजीराजा
सागरा प्राण तळमळला ही गाणी उत्कट ओढ देशप्रेम उफाळून येणारी आहेत शब्द रचना संगीत व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरात ही गाणी तमाम भारतीय संस्कृतीचा वारसा सांगणारी व मनाला उभारी देणारी आहेत आणि म्हणूनच विनायक दामोदर सावरकर हे यामुळेच आम्हाला जवळचे वाटतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा