आर. पी .आय .आठवले गट सोलापूर जिल्हा कार्यकारिणी याचा पंधरवड्यात जाहीर करू, जिल्हाध्यक्ष ---सोमनाथ भोसले
श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार
बी.टी. शिवशरण
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9579 177 671.
आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा कार्यकारिणी निवड येत्या पंधरा दिवसांत जाहीर केली जाईल अशी माहिती आरपीआयचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिली आहे त्यांनी सांगितले की क्रियाशील सभासद नोंदणी करण्यासाठी थोडा वेळ होत आहे सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी मध्ये नाव आली आहेत मात्र करमाळा बार्शी मंगळवेढा या तीन तालुक्यातील क्रियाशील सभासद नोंदणी पुर्ण नसल्याने तेथील कार्यकर्ते जिल्हा कार्यकारिणी मध्ये घेण्यात अडचण होती येत्या पंधरा दिवसांत त्या तीन तालुक्यातील कार्यकर्त्यांची नावे येथील त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाईल आज दुपारी एक पोस्ट लिहुन कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या होत्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणी निवड होत नसल्याने कार्यकर्त्यांत मरगळ अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कमेंट करुन दाद दिली आज संध्याकाळी नऊ वाजता जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी भ्रमणध्वनी करुन जिल्हा कार्यकारिणी येत्या पंधरा दिवसांत जाहीर केली जाईल अशी माहिती दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा