Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर चा तिसरा हप्ता 100 रु. बँकेकडे वर्ग


 

संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स - 45 -न्युज मराठी

मो.9730 867 448

                      श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर चे गळित हंगाम 2022 /2023 मध्ये गळितास आलेल्या ऊसासाठी सरसकट रू 100 प्रती मे टन प्रमाणे तिसरा हाप्ता दि 20 /9 /2023 रोजी बँकेत वर्ग करणेत आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी रू 200/प्रती मे टन प्रमाणे दुसरा हप्ता वर्ग करणेत आला आहे, सद्यस्थिती शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती चा सामना करावा लागत असलेचा विचार करून कारखान्याचे चेअरमन व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळाने तिसरा हप्ता अदा करणेचा निर्णय घेतला असलेचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.

          आतापर्यंत कारखान्याने प्रती मे टन रू 2400/प्रमाणे ऊस बिल अदा केले असून एफ आर पी ची टक्केवारी 100% पूर्ण केली असून एफ आर पी पेक्षा जादा दर दिला जाणार आहे. उर्वरित ऊस बिल अंतिम हप्ता रू 111/- प्रति मे टन प्रमाणे दिवाळी सणा पूर्वी अदा केला जाणार आहे, तरी सर्व सभासद व बिगर सभासद यांनी कारखाना प्रशासनावर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपला सर्व ऊस येणाऱ्या सिझन मध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे असे आवाहन व्हा.चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा