(बिजवडी) रावबहादुर गट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती साजरी.
अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक,आपल्या पहिल्या सशस्त्र लढ्याद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे निधड्या छातीचे वीर राजे उमाजी नाईक यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित शिक्षणप्रेमी नागरिक बाळासाहेब जाधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमा साठी शिवाजी चव्हाण,सौ. अर्चना चव्हाण,सौ.सारिका चव्हाण,सौ.गिरीजा गेजगे हे शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमीर फकीर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा