अकलूज येथे संत शिरोमणी श्री. संत सेना महाराज यांची 722 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.
अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
अकलूज नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची ७२२ वी जयंती विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शी येथील ह.भ.प विठ्ठलपंत कंदारे महाराज यांनी व त्यांच्या साथीदारांनी सुश्राव्य अशी संत सेना महाराजांच्या जीवन कार्याची माहिती उदाहरणासह व अभंगासह उपस्थित बांधवांना व महिलांना सांगितली.त्यानंतर दुपारी १२:१५ वाजता सेना महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब राऊत व शकुंतला राऊत यांच्या हस्ते आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला.
पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून जि.प. प्रा. शाळा मुली नं.१ अकलूज येथील विद्यार्थिनींना २०० पानी वही,प्रयोगवही,पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी संग्रामनगरचे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत साळुंखे,सौ.कविता काशीद,अध्यक्ष किशोर राऊत, सचिन चौधरी,अमर देवकर,जेष्ठ सदस्य शिवाजी राऊत,ॲड. सुभाष राऊत,अरुण राऊत,विजय माने,विजय राऊत,राजू राऊत,नंदकुमार काशीद,संतोष सूर्यवंशी,विकास शेटे,रणजीत साळुंखे,संतोष राऊत,अनिल काशीद,आदेश राऊत,निलेश राऊत,आबासाहेब सूर्यवंशी,सुनील काशीद,मनोज सुरवसे,शत्रुघ्न राऊत,राहुल जाधव,मारुती ननवरे व सर्व समाज बांधव महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुली नं.१ शाळेचे मुख्याध्यापक कैलास गायकवाड,उमेश फलटणकर, संतोष यादव यांचे विशेष योगदान लाभले.श्रीकांत राऊत यांनी उपस्थित मान्यवर मंडळींचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा