Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

उजनी धरण वृत्त---" आनंदाची बातमी" धरणात 25 क्युसेस विसर्गाने पाणी येत आहे.

 उजनी धरण वृत्त---" आनंदाची बातमी" धरणात 25 क्युसेस विसर्गाने पाणी येत आहे.


टेंभुर्णी ------प्रतिनिधी

मुकुंद रामदासी(बेंबळे)

टाइम्स- 45- न्यूज मराठी

मो. 9960 202 630

                   शनिवार ९ सप्टेंबर सायंकाळपासून उजनी जलाशयात दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ होत असून 25 हजार 721 विसर्गाने ऊजनीत पाणी येऊ लागले आहे व यामध्ये वाढच होईल, तसेच आगामी चार ते पाच दिवसाच्या आत जलाशयात 40 ते 42 टक्के पाणी येईल व 2 0 ते 22 टीएमसी पाणीसाठा होईल असे अनुकूल वातावरण तयार झाले असल्याची अधिकृत माहिती धरण नियंत्रण विभागाकडून मिळालेली आहे. 2023 च्या पावसाळ्याचे तीन महिने संपले असून अद्याप एक ते सव्वा महिना बाकी राहिला आहे तरीपण अद्याप पर्यंत पाऊस नसल्यामुळे धरणात दहा टीएमसी पाणीसाठा व 18 टक्के पाणी आलेले आहे 



व सर्वत्र चिंताजनक वातावरण तयार झाले आहे, मागील वर्षी 2022 च्या पावसाळ्यात मात्र 12 ऑगस्ट22 रोजी उजनी धरण 100 टक्के भरले होते व 50 ते 60 हजार क्यूसेक्स पाणी भीमा नदीत पाणी सोडून देण्यात आले होते. सध्या आठ व नऊ सप्टेंबर रोजी पुणे परिसर लोणावळा पश्चिम घाट व भीमाशंकर डोंगर भागात दमदार पाऊस होत असल्यामुळे उजनीच्या वरील 19 धरणांपैकी वडिवळे ,चासकमान, पवना, आंध्रा, कासारसाही, कलमोडी,व वरसगाव या सात धरणातून 22 हजार 

231 क्यूसेक्स विसर्गाने पाणी खाली सोडण्यात आले आहे, तसेच उजनी धरण लाभक्षेत्र परिसरातील दौंड, भिगवन, राशन या भागात ही पाऊस बऱ्यापैकी होत आहे या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे 9 सप्टेंबर च्या सायंकाळी दौंड येथून 25 हजार 721 क्यूसेक्स विसर्जाने पाणी उजनी धरणात येण्यास सुरुवात झालेली आहे व यामध्ये वाढच होईल असे धरण नियंत्रण विभागाकडून समजते. भीमाशंकरचे डोंगर व लोणावळा पश्चिम भागात पावसाचा जोर कमी अधिक होत आहे तरीपण आगामी काही दिवसात उजनी धरणातील पाणीसाठ्यात बऱ्याच प्रमाणात वाढ होईल हे निश्चित.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा