Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

बेडसिंग येथे होते गाव गौण खनिजाची चोरी

 इंदापूर तालुक्यातील बेडसिंग येथे होते गाव गौण खनिजाची चोरी!

इंदापूरच्या लोकप्रतिनिधीचे एन. पी. इन्फ्रा कंपनीची लागेबांधे, असल्याने गौण खनिजाची चोरी---- अतुल खूपसे पाटील

 


संपादक----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9730 867 448

               गेली अनेक दिवस इंदापूर तालुक्यातील बेडशिंग गावच्या हद्दीतील एन पी इन्फ्रा कंपनी चर्चेत आहे. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी चे एन पी इन्फ्रा कंपनीशी लागेबांधे असल्यामुळे बेडशिंग गावच्या हद्दीतून कोणत्याही परवानग्या नसताना राजरोसपणे गौण खनिजाची चोरी केली जात आहे असे जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी इंदापूर शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच त्यांनी दि.१८ रोजी इंदापूर तहसील कार्यालयाबाहेर डेरा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले की इंदापूर तालुक्यातील बेडशिंग या गावाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात एन पी इन्फ्रा कंपनी गौण खनिजाची चोरी करत आहे. या चोरीकडे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे हे जाणून बुजून कानाडोळा करत आहेत. जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी व आवाज उठवण्यासाठी जे प्रतिनिधी निवडतो त्याच प्रतिनिधीचे दुर्लक्ष या गौण खनिजाच्या चोरीकडे झाले आहे. तसेच इंदापूरचे तहसीलदार तालुक्याचे पालक असतानाही त्यांनीही या गौण खनिजाच्या चोरीकडे डोळे झाक केली आहे. इंदापूर तालुका हा खडी क्रेशर चा तालुका म्हणून राज्यात परिचित आहे. मात्र या क्रेशरच्या माध्यमातून अपेक्षित आहेत तेवढा निधी शासनाला न जाता तो निधी लोकप्रतिनिधी व तहसीलदार यांच्या घरात जात असल्याचा आरोप अतुल खूपसे- पाटील यांनी केला आहे.


ज्या तालुक्यांमध्ये आठ सर्कल येतात या गावांमध्ये महसूल च्या माध्यमातून २५ ते ३० खाणी आहे असे भासवले जाते. मात्र या खाणीची संख्या ४० पर्यंत आहे. यामध्ये बऱ्याच खाणी अनधिकृत पणे चालू आहेत. त्यामुळे मी तहसीलदारांना विनंती करतो की जर तुम्ही योग्य असाल तर आजच संबंधित तलाठ्यांना आदेश करा आणि त्या ठिकाणी असलेल्या खाणींचे पंचनामे करा. जर उत्खनन बाबत परवानगी नसेल तर सदर खाण मालकाच्या जमिनीवरती बोजा चढवा अथवा संबंधित उत्खनन करत असलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई दि.१८ तारखेपर्यंत करावी. संबंधित गौण खनिजाचा खड्डा एटीएस च्या मोजणी द्वारे मोजावा. जेणेकरून काळ्या सोन्यावर डल्ला मारणाऱ्या खाण माफियांवरती योग्य कारवाई होईल.


इंदापूर तालुक्याशी काही संबंध नसलेल्या तपाडिया या ठेकेदाराला वडापुरी ते शेटफळ हा कोट्यावधी रुपयाचा रस्ता दिला जातो. यावेळी लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते म्हणतील की माझ्या हातात हे नसून ते सर्व बांधकाम विभागाच्या हातात आहे. मात्र माझा स्पष्ट आरोप आहे की इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी टक्केवारीसाठी बाहेर गावच्या ठेकेदाराला रस्ते देतात ही एक इंदापूर तालुक्यातील जनतेला घेण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. या सर्व गोष्टीची आपणाला चौकशी करायची असेल तर भरणे यांचे पीए सहाय्यक, तपाडिया यांचा मॅनेजर प्रजापती, एन पी इन्फ्रा कंपनी व स्वतः लोकप्रतिनिधी यांचे मोबाईल उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चेक करावेत त्यामध्येच सर्व काही गुपित सर्वांसमोर येईल असे अतुल खूपसे पाटील म्हणाले. जर शासनाने येणाऱ्या दि .१८ सप्टेंबर पर्यंत एन पी इन्फ्रा कंट्रक्शन या कंपनी वरती योग्यती कारवाई न केल्यास इंदापूर तहसील कार्यालयाबाहेर डेरा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.



ठेकेदाराकडून लोकप्रतिनिधीला कोट्यावधी रुपये किंमतीची एल सी गाडी भेट....!!


एन पी इन्फ्रा कंट्रक्शन चा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा हप्ता चालू आहे. तसेच एन पी कंट्रक्शने इंदापूरचे लोकप्रतिनिधी यांना कोट्यावधी रुपये किंमतीची एल सी गाडी भेट दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही लोकप्रतिनिधीला कुठे होती रुपये किमतीची गाडी भेट देत असेल तर तुमच्या सारख्या सामान्य शेतकरी लोकांचा विचारण्याची गरज काय. आमदारांचा हात डोक्यावर ठेवून सर्वसामान्यांना छळण्याचे काम ही कंपनी करत आहे.


अतुल खूपसे-पाटील.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा