मौजमजा करण्यासाठी 45,लाख रु.च्या 7 गाडी मालकांची फसवणूक करणाऱ्या अट्टल ठकास गुन्हे शाखा युनिट -3 पुणे शहर च्या वतीने मुद्देमालासह अटक
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
मौज मजा करण्यासाठी लोकांची फसवणूक करणाऱ्या ठकास कोथरूड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 कडून अटक करून त्याच्याकडून एकूण सुमारे 45 लाख रुपये किमती ची 7 वाहने जप्त करण्यात आली आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की इसम नामे अभिजीत अजित रतवेकर वय 36 वर्षे धंदा ड्रायव्हर रा. समर्थ कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 37 मानाजी नगर नर्हेगाव पुणे यांची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार नंबर MH-12/NP--1637 किंमत 5 लाख 50 हजार रुपयाची ही गाडी सयाजी पाटील रा. तात्याबा कॉम्प्लेक्स नऱ्हेगाव- पुणे यांनी शिरवळ येथील कंपनीत महिना 50 हजार रुपये भाडे तत्वावर लावून देतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून गाडी घेऊन जाऊन कोणताही परतावा न देता त्यास वारंवार विनंती करूनही त्याने तक्रारदार यांची गाडी परत न करता फसवणूक केली म्हणून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असुन गुन्हा रजिस्टर नंबर 411/2023 भारतीय दंड विधान कलम 406, 420, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक 'राहुल पवार' गुन्हे शाखा युनिट;- 3 पुणे शहर हे करत असताना आरोपी सयाजी ज्ञानदेव पाटील रा. फ्लॅट नंबर 101 तातोबा कॉम्प्लेक्स मानाजी नगर नऱ्हे पुणे, मुळगाव अमनापुर ,ता. पलूस जि. सांगली यास शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळालेल्या बातमीवरून पकडून यास अटक करून त्याचे कडे तपास केले असता त्यांनी खालील इसमांची तक्रारदार यांचे प्रमाणे फसवणूक केल्याची तपासात निष्पन्न झाले आहे. 1) रामेश्वर दामोदर शेळके रा. यशोदीप चौक वारजे माळवाडी- पुणे ,यांची 7 लाख रु. किमताची मारुती सुझुकी कंपनीची डिझायर कार नंबर MH-12/KN 8545 .
2) रवींद्र जनार्धन जाधव रा. प्रियंका डेव्हलपर्स फ्लॅट नंबर 303 पौर्णिमा हाइट्स जवळ नरे पुणे , यांची 4 लाख रुपये किमतीची फोर्ट कंपनीची फिएस्टा नंबरM H-12 / DS-5220
3) शशिकांत अमृत बरगे रा. पांढरवाडी पो. डिकसळ ता. खटाव जि. सातारा यांची 9 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार नंबर MH-11 /DA-0684
4) बाबू शंकर राठोड वय 45 वर्ष रा.गणेश नगर- बोपखेल ,पुणे यांची 6 लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची ईरटीका कार नंबर MH-14 /KF--0430
5) विभुते यांची 7 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार नंबर MH-45 /AC-7987
6) गणेश सोपान धोत्रे रा. सिटी सर्वे नंबर 32 / 18 धायरी गाव पुणे यांची 5 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनआर- कार नंबर MH-12 / RT--4208
7) दाखल गुन्ह्यातील तक्रारदार यांची 5 लाख 50 हजार रुपये किमतीचे मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार नंबर MH -12 / NP--1637 अशा एकूण सात चार चाकी वाहने त्यांची एकूण किंमत 43 लाख 50 हजार रुपये किमतीच्या नमूद आरोपीकडून जप्त करण्यात आलेले आहेत
आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने सदरचा गुन्हा हा स्वतः मौजमजा करण्यासाठी केला असल्याचे तपासात सांगितले आहे
सदरची ही कामगिरी पोलिस आयुक्त पुणे शहर- रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त -पुणे शहर, संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त- गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर -अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पुणे शहर- सुनील तांबे , यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 कोथरूड चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक- श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक -अजित कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक -राहुल पवार, पोलीस अंमलदार -संतोष क्षीरसागर राजेंद्र मारणे ,शरद वाकसे , ,किरण पवार, सुजित पवार, संजीव कळंबे, राजेंद्र मारणे, किरण पवार ,सुजित पवार, संजीव कळंबे , सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते ,सतीश कञाळे , प्रकाश कट्टे साईनाथ पाटील , प्रताप पडवळ, साईनाथ कारके, गणेश शिंदे, भाग्यश्री वाघमारे ,यांचे पथकाने केले आहे.
..................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा