Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

जालन्यातील पोलीस लाठी हल्ल्यात जखमी झालेल्यांना महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी

 

श्रीपूर----- जेष्ठ पत्रकार

  बी.टी. शिवशरण

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो.9579 177 671

                   जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उपोषणाला बसलेले लोकांचें आंदोलन पोलिस बळाचा वापर करून मोडून काढण्यासाठी तरुणांवर महिलांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला त्यात अनेक तरुण मुले महिला गंभीर जखमी झाल्या त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले राज्यभर संतापाची लाट उसळली राज्यभर मोर्चे निदर्शने आंदोलन सुरू आहेत या बाबत उपमुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची माफी मागितली आहे सदर घटने बाबत दिलगिरी व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी माफी व दिलगिरी व्यक्त केली असली तरी जखमींचे त्याने समाधान होणारं नाही त्यांच्या गंभीर जखमा यातना वेदना पहाता जर खरोखर शासनाला परिमार्जन घ्यायचे असेल तर महाराष्ट्र शासनाने सर्व जखमींना पंचवीस लाख रुपये मदत द्यावी कारण या जखमी नागरिकांचा कोणताही अपराध गुन्हा नसताना पोलिस प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने कायदा हातात घेतला आणि निरपराध व्यक्तींना बेदम मारझोड केली आहे त्यामुळे त्यांची माफी तर मागितली पाहिजेच पण त्यांची चुक नसताना त्यांना गंभीर जखमी केले म्हणून रोख पंचवीस लाख रुपये त्वरित मदत दिली पाहिजे


                            जाहिरात प्रसिद्ध 



संपर्क साधा,8408817333

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा