Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

*25/4 लवंग वाघोली येथे जालना घटनेचा निषेध.*

 *25/4 लवंग वाघोली येथे जालना घटनेचा निषेध.*

गणेशगांव प्रतिनिधी 

नूरजहाँ शेख


जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करीत असताना पोलिसांनी आंदोलकांवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस दलाकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक महिला व युवक जखमी झाले आहेत याचा निषेध म्हणून आज सकाळी आठ वाजल्यापासून माळशिरस तालुक्यातील २५ /४ लवंग परिसरात व्यापा-यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेऊन तसेच टेंभुर्णी-अकलूज महामार्ग बंद करून गणेशगाव,वाघोली,लवंग,तांबवे येथील ग्रामस्थांनी शांतता पूर्वक संयमाने निषेध व्यक्त केला .

          माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील युवकांनी एकत्र येऊन सभा घेतली व मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर व राज्य शासनावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.या प्रसंगी एक मराठा लाख मराठा,जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.दिगंबर मिसाळ,केचे-पाटील,रावसाहेब पराडे-पाटील,अशोक मिसाळ यांनी आपल्या मनोगतातुन पोलीस खात्यावर व राज्य शासनावर कडाडून टिका करत निषेध व्यक्त केला.या वेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व विविध जाती धर्माचे युवक उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

------------------------------------------------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा