जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकावर लाठी मार
उद्या" महाराष्ट्र बंद "ची हाक
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
, गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकार्यांना आज (दि. १) अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधूर आणि लाठीचार्ज केला.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी शहागड येथे आंदोलन झाल्यानंतर त्या दिवसापासूनच जरांगे हे अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम होते. त्यांनी शुक्रवारपर्यंत सरकारला मुदत दिली. अखेरीस सायंकाळी अंतरवाली येथील आंदोलन मोडून काढण्याचे ठरविण्यात आले, व पोलिसांनी बळाचा वापर केला. यात एक महिला जखमी झाल्याचे प्राथमिक वृत आहे.
दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा