जालना मराठा आंदोलकावर लाठीचार्ज चौकशीचे दिले आदेश
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केल्याचंही समोर आलंय.
"जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज, फडणवीसांचं नाव घेत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया," म्हणाले…
यात आंदोलकांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी,” असा आरोप शरद पवारांनी केला.
"लाठीचार्जच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया"
. मी स्वत: उपोषणकर्त्याबरोबर बोललो होतो. मी अधिकाऱ्यांनाही बोललो होतो. पोलीस एस पी आणि कलेक्टरशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांना रुग्णालयात नेणं जरुरीचं होतं. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. पण त्यावेळी दगडफेकीची दुर्देवी घटना घडली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
सरकार याची सखोल चौकशी करेल. यातून खरं वास्तव्य समोर येईल. दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल”, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.
"मराठा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया"
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या आंदोलकांवर झालेली लाठीचार्जची घटना निषेधार्ह आहे. मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करते. गेल्या चार दिवसांपासून शांततेने आंदोलक सुरू आहे. पण पोलिसांनी गुरुवारी अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला. ज्यात अनेकजण जखमी झाले. खरतंर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्रालय आणि गृहमंत्री यांचे हे अपयश आहे. त्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, हे झालंच कसं आणि का? याबाबत त्यांनी खुलासा करणे आवश्यक आहे, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.
दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज झालेल्या घटनेचे पडसाद धुळे-सोलापूर महामार्गावर उमटले. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा