Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण सहभागी मूल्यांकन

 

विशेष- प्रतिनिधी --संजय लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9822 203 255

                          बागेचीवाडी (ता.माळशिरस) येथे पाणीव कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी बागेचीवाडी गावामध्ये रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण सहभागी मूल्यांकन सादर केले.रांगोळी द्वारे रेखाटलेल्या आराखड्यांमध्ये गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन,वनस्रोत,जलस्रोत ,एक लागवड क्षेत्र, कुरणक्षेत्र,फळबाग,ग्रामपंचायत कार्यालय,शाळा,विविध रस्ते तसेच गावातील प्रमुख ठिकाणे दाखविण्यात आली.रांगोळीतून जनजागृती करण्याचे काम यावेळी कृषीकन्यांमार्फत करण्यात आले. 

        यावेळी गावातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड,प्रा.ढेकळे तसेच ग्रामस्थ सतीश दडस,अमोल साळुंखे,स्वप्नील कदम,सुजाता इंगळे,राज्यश्री चव्हाण आदी गावकरी उपस्थित होते. 

        या उपक्रमाचे नियोजन कृषी कन्या सोनाली जामदार, धनश्री चव्हाण,अनुजा शेगांवकर,मोहिनी दळवी,साक्षी रुपनवर,तेजस्विनी ढवळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एच.बी.हाके,उपप्राचार्य डॉ. एच.डी.राऊत,रावे प्रमुख डॉ.जे.आर.शेख यांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा