अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज भाषा भगिनी,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा अकलूज, वाचाल तर वाचाल योजने अंतर्गत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे 12 पुस्तकांचे वाटप व आठवणी कविवर्य ना.धो.महानोर यांच्या या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
याच हेतुने शंकरराव मोहिते महाविद्यालय व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा अकलूज यांचे वतीने नरेंद्र दाभोळकर यांच्या १२ पुस्तकांचे संच वाटप कार्यक्रम आयोजित केलेला होते.याप्रसंगी आठवणी ना.धो.महानोर यांच्या या कार्यक्रमाचेही आयोजन केलेे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी विषयाचे प्राध्यापक रोहित देशमुख यांनी ना.धो.महानोर यांच्या आठवणी,त्यांची गाणी व कविता या संदर्भात मांडणी केली.
या कार्यक्रम प्रसंगी प्रा.पंकज पवार सातारा यांनी नरेंद्र दाभोळकर यांचे मानवतावादी कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी ६५ जणांना दाभोळकर यांच्या १२ पुस्तकांचा संच वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड,डॉ.अपर्णा कुचेकर,प्रा.मनोज वर्दम,औंदुबर भिसे,सिने कलावंत,दिग्दर्शक योगिराज भिसे यांचेसह महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विदयार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालन हितेष पुंज याने केले तर आभार सुरज ननवरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा