Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

महूद ता. सांगोला येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व साहित्य वाटप

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स - 45 -न्युज मराठी

मो.9730 867 448

                         केंद्र शासन (एलिम्को), जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सोलापूर , शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज, श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अकलूज व डाॅटर्स माॅम्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वयोश्री व ए.डी.आय.पी. योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी महुद ता. सांगोला येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासणी केलेल्या दिव्यांग आज कृत्रिम अवयव व साहित्य यांचे वाटप केले गेले._



   . यावेळी आमदार .रणजितसिंह मोहिते पाटील, MITRA चे CEO प्रविणसिंह परदेशी(IAS), सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी चे संघटनमंञी .धैर्यशील मोहिते-पाटील, सांगोला तालुक्याचे नेते बाबासाहेब देशमुख, अकलुज चे माजी सरपंच .शिवतेजसिंह मोहिते पाटील, गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी एलिम्को संस्थेच्या रोहिणी कारंडे, मेहंक मेहता, विभुती साहु आदी अधिकारी उपस्थित होते,_



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा