*जंगल संवर्धन हि काळाची गरज...!*
आज संपूर्ण महाराष्ट्रात महामार्गाच्या रस्त्याची काम मोठ्या प्रमाणात चालू आहेत.त्यामुळे रस्ते मोठे होऊ प्रगती होऊ लागली आहे पण शंभर वर्षांपूर्वीची जपलेली रस्त्याच्या बाजूला उभा असलेली मोठं मोठे वृक्ष जमीन दोस्त होऊ लागली आहेत.त्यामुळे पर्यावरणाचा -हास होऊ लागला आहे व हवेतील ऑक्सिजन प्रमाण कमी झालेले आहे.याचा परिणाम कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किंमत संपूर्ण जगाला समजली होती.वृक्षांची भर दिवसा कत्तल होत असल्यामुळे झाडावर असलेली पक्षांची घरटी झाडाबरोबर उन्मळून पक्षी पण बेघर होऊ लागले आहेत तर जंगलातील वन्य व हिंस्त्र प्राणी गावा गावात,शहरा शहरात वास्तव्याला येऊ लागले आहेत.अकलूज येथील शिवापूर पेठेतील महालक्ष्मीसमोर जंगल संवर्धन काळाची गरज ही सजावट सौ.शिला दिलीप जठार, सौ. प्राजक्ता प्रथमेश जठार यांनी केली आहे.(छाया:- संजय लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा