Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

गौरी गणपतीच्या माध्यमातून सर्व धर्म सम भाव आणि झाडे लावण्याचा संदेश.

 


ॲड.--शीतल शामराव चव्हाण

 उमरगा 

मो.9921 657 346

                        दरवर्षी गौरी-गणपतीचा उत्सव राज्यभर मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवात अनेक देखावे सादर करुन समाजोपयोगी संदेशही दिले जातात.

उमरगा शहरात सलूनचा व्यवसाय करणारे सामाजिक कार्यकर्ते व ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी प्रदिप चौधरी यांनी आपल्या घरातल्या गौरींची आरती रजाक अत्तार, सायराबानू अत्तार आणि करीम शेख यांच्या हातून करीत सर्वधर्मसमभावाचा संदेश अनोख्या पद्धतीने दिला आहे. धार्मिक कट्टरतेने टोकाचे वळण घेतले असतानाच्या काळात हा सद्भावनेचा संदेश उद्बोधक आहे. प्रदिप चौधरी यांनी गौरी पुजेनंतर रोपट्यांचे वाटप करुन 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेशही दिलेला आहे. यंदा महाराष्ट्रात आणि खासकरुन मराठवाड्यात पाउस कमी आहे. मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि प्रदुषण हे निसर्गाचे चक्र बिघडण्याला कारणीभुत आहे. अशा परिस्थितीत गौरी-गणपतीच्या सणानिमित्त दिलेला 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेशही लोकोपयोगी आहे.



प्रदिप रावासाहेब चौधरी पदाधिकारी ॲड.शीतल चव्हाण फाऊंडेशन उमरगा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने अशा अनोख्या पद्धतीने गौरी-गणपती उत्सव साजरा केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा