Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

सरकार सपशेल अपयशी ठरले

 आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले,


श्रीपूर ---ज्येष्ठ पञकार

 बी.टी.शिवशरण 

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.-9527 456 958

                    महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण राजकारण तापले आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अकरा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे मराठा समाजाला आरक्षण व मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यासाठी ते अडून बसले आहेत त्यांच्या बरोबर वाटाघाटी चर्चा मध्यस्थी करणारे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या अडचणी आहेत तसेच बावन्न टक्के आरक्षणा चे वर ते वाढवता येत नाही पण ते कसे देता येणार नाही का देता येणार नाही व द्यायचे तर कसे द्यायचे हे सांगता येत नसल्याने महाराष्ट्र सरकार पुर्ण या बाबतीत अपयशी ठरले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही दुसरीकडे ओबीसी समाज आता पेटुन उठला आहे 





आमच्या कोट्यातून व वाट्यातून कोणाला ही आरक्षण देऊ नये यासाठी त्यांनीही उपोषण आंदोलन सुरू केले आहे मात्र राजकीय लाभ उठवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटून सहानुभूती दाखवत आहेत आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे असे म्हणून राज्यात मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्यक्षात आरक्षणावर अभ्यास करून बोललं पाहिजे नक्की माहिती दिली पाहिजे हे होतांना दिसत नाही महाराष्ट्र सरकार ने तज्ञ अभ्यासकांचे शिष्टमंडळ नेमले पाहिजे त्यांनी आरक्षण या विषयावर सखोल माहिती व सकारात्मक भुमिका मांडली जावी बिचारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट आपले धोरण जाहीर केले पाहिजे सत्ता टिकवण्यासाठी मराठा ओबीसी समाज दलित मागासवर्गीय यांचेत संभ्रम निर्माण करु नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्पष्ट बोलतच नाहीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढेंच बोलून वेळ मारुन नेतात देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा आरक्षणावर किती अभ्यास वा माहिती आहे हे संशोधनाचा विषय आहे नेतृत्व असं पाहिजे की शब्द दिला तर पाळला पाहिजे जे देता येणार नाही असा शब्द देऊ नये आपलं मत स्वच्छ प्रामाणिक व सत्य असलं पाहिजे तरच ते सत्ताधारी म्हणून राज्य करायचे पात्रतेचे होऊ शकतात राज्यात विकासाचे प्रश्नांवर सरकार थांबल्यामुळे गदारोळ सुरू आहे तर आता आमच्याही समाजाला आरक्षण द्या म्हणून प्रत्येक जात व त्यांचे नेते सक्रिय होऊ लागले आहेत या सर्व गदारोळात सरकार बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे 






 मनोज जरांगे पाटील यांच्या सारख्या सामान्य नेत्याने मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना गुडघ्यावर आणलं आहे जरांगे पाटील हे स्पष्ट व ठाम आहेत ते आपल्या भुमिकेपासून तसूभरही हलायला तयार नाहीत ते त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते त्यांचें आमरण उपोषण सोडायला तयार नाहीत महाराष्ट्र सरकार यांवर निश्चित तोडगा काढण्यासाठी. कमी पडताना दिसत आहे महाराष्ट्र सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही राज्यात भाजपचे व केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण व कुणबी दाखला देण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत सदर विषय दिल्ली पर्यंत का नेत नाहीत













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा