गरीब शेतकरी कुटुंबामधील मुलीचे घवघवीत यश तिची M B B S मध्ये निवड
अकलूज -----प्रतिनिधी
केदार---लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
मो-9890 095 283
'
माळशिरस तालुक्यातील लवंग येथील कु.अक्षता शरद वाघ हिने नीट परीक्षेमध्ये ७२० पैकी ५६६ गुण मिळवून तीने घवघवीत यश संपादन केले आहे तसेच सीईटी परीक्षेमध्ये ९९.२४% गुण मिळवून यश संपादन केले असून या यशाबद्दल मराठा सेवा संघ पुणे विभागाचे वतीने तिचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
एका गरीब मराठा शेतकऱ्याच्या मुलीने घवघवीत यश संपादन केल्यामुळे तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.या यशामध्ये तिचे वडील शरद चांगदेव वाघ व विद्या शरद वाघ यांचा मोलाचा वाटा आहे यांचे मार्गदर्शन लाभले असून यावेळी लक्ष्मीनारायण नगर अकलुज या ठिकाणी शिवमती वनिता बाळासाहेब कोरटकर पुणे विभागीय सचिव,हेमलता मुळीक,भारती माने,तेजश्री जाधव,स्वाती आवड,ज्योती ढेंबरे लता वाघ यांनी तिचा शाल, पुस्तक व मराठा सेवा संघाचे कॅलेंडर देऊन सन्मान केला.व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा